भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत पदके मिळवायची असतील तर क्रीडा क्षेत्राला चांगल्या सोयीसुविधा पुरविणे गरजेचे आहे, त्यासाठी सर्वप्रथम तशाप्रकारची व्यवस्था उभारणे गरजेचे आहे, असे परखड मत भारताचा नेमबाज अभिनव बिंद्रा याने व्यक्त केले आहे. इंग्लंडसारखा देश क्रीडा क्षेत्रात प्रचंड गुंतवणूक करतो. त्याचा हिशोब लावायचा झाल्यास  इंग्लडला प्रत्येक पदक जिंकण्यासाठी साधारण ४८ कोटी खर्च करावे लागतात. भारतामध्येही क्रीडा क्षेत्रात अशाप्रकारची गुंतवणूक होणे गरजेचे आहे. जोपर्यंत देशात व्यवस्था दुरुस्त होत नाही तोपर्यंत पदकाची अपेक्षा करता येणार नाही, असे बिंद्राने ट्विटरवरील संदेशात म्हटले आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये विविध खेळांमध्ये सहभागी झालेल्या भारताच्या ११९ खेळाडूंपैकी अद्याप एकाही खेळाडूला पदक जिंकता आलेले नाही. भारताच्या खेळाडूंवर पदक न मिळाल्याने टीका करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अभिनव बिंद्रा याने भारतीय व्यवस्थेतील दोषांवर बोट ठेवले.
Rio 2016 : भारतीय खेळाडू फक्त सेल्फी काढायला रिओला गेलेत- शोभा डे
काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी भारतीय खेळाडू रिओ ऑलिम्पिकला सेल्फी काढायला आणि मजा करायला गेले आहेत असे आक्षेपार्ह ट्विट केले होते. त्यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर शोभा डेवर सडकून टीका झाली. नेमबाज अभिनव बिंद्रा, हॉकीपटू विरेन रस्किना पासून अनेक दिग्जांनी टीका केली होती.
वजा अधिक; बाकी उणे : पांढरा हत्ती पोसण्याचे दु:ख!