Rishabh Pant 1st Indian Wicketkeeper to complete 100 dismissals in WTC : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ येथील पहिल्या कसोटीत सामन्यात ऋषभ पंतने आपल्या दमदार क्षेत्ररक्षणाने अनोखे शतक झळकावले आहे. यासह पंतने अशी कामगिरी केली आहे, जी आजपर्यंत कोणत्याही भारतीयाला करता आलेली नाही. तो गेल्या काही काळापासून टीम इंडियासाठी चांगली कामगिरी करत आहे. त्याची गणना सर्वोत्तम भारतीय यष्टीरक्षकांमध्ये का केली जाते? हे मैदानावरील त्याची चपळता पाहून समजते.

ऋषभ पंतने केला मोठा पराक्रम –

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या डावात ऋषभ पंतने ॲलेक्स कॅरी, पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्कचे झेल घेतले. यासह त्याने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात त्याने १०० खेळाडूंना बाद (कॅच + स्टंपिंग) करण्याचा पराक्रम केला आहे. त्याच्या आधी, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये कोणत्याही भारतीय यष्टीरक्षकाला १०० फलंदाजांना बाद करता आले नव्हते. आता पंतने हा मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

ऋषभ पंत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात १०० खेळाडूंना बाद करणारा तिसरा यष्टिरक्षक ठरला आहे. त्याने डब्ल्यूटीसी मध्ये आतापर्यंत ८७ कॅच आणि १३ स्टंपिंग केले आहेत. त्याच्या आधी ॲलेक्स कॅरी (१३७ ) आणि जोशुआ दा सिल्वा (१०८ बाद) यांनी ही कामगिरी केली आहे. ऋषभ पंतने पहिल्या डावात भारतासाठी ३७ धावांचे योगदान दिले.

हेही वाचा – Rishabh Pant : ‘या’ खेळाडूवर २५ कोटींहून अधिक रुपयांची बोली लागणार’, IPL 2025 च्या महालिलावापूर्वी सुरेश रैनाचे मोठे भाकीत

u

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक फलंदाजांना बाद करणारे यष्टिरक्षक:

  • ॲलेक्स कॅरी: १३७ (१२५ कॅच आणि १२ स्टंपिंग)
  • जोशुआ दा सिल्वा: १०८ (१०३ कॅच आणि ५ स्टंपिंग)
  • ऋषभ पंत: १०० (८७ कॅच आणि १३ स्टंपिंग)
  • टॉम ब्लंडेल: ९० (७८ कॅच आणि १२ स्टंपिंग)
  • मोहम्मद रिझवान: ८७ (८० कॅच आणि ७ स्टंपिंग)

हेही वाचा – Shreyas Iyer : IPL 2025 लिलावापूर्वी श्रेयस अय्यरचा मोठा धमाका; षटकार-चौकारांचा पाऊस पाडत गोव्याविरुद्ध झळकावले वादळी शतक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पर्थ कसोटीचा दुसरा दिवस भारताच्या नावावर राहिला –

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत कर्णधार जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर टीम इंडियाने केवळ १५० धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १०४ धावा केल्या. अशा प्रकारे टीम इंडियाला पहिल्या डावाच्या आधारे ४६ धावांची आघाडी मिळाली. केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने दुसऱ्या डावात १७२ धावा केल्या आहेत. अशा प्रकारे टीम इंडियाची एकूण आघाडी २१८ धावांची झाली आहे. सध्या केएल राहुल ६२ धावा करून क्रीजवर आहे, तर यशस्वी जैस्वाल ९० धावांवर खेळत आहे.