India vs England 4th Test, Rishabh Pant Six: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टरमध्ये सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या दिवशी फलंदाजी करत असताना ऋषभ पंतच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. ख्रिस वोक्सचा वेगवान चेंडू त्याच्या उजव्या पायाच्या बोटांना जाऊन लागला. त्यामुळे मैदान सोडून जावं लागलं. दुसऱ्या दिवशी तो फलंदाजीला येईल याची शक्यता खूप कमी होती. पण तो फलंदाजीला आला आणि आपण अर्धशतक पूर्ण केलं. त्याने आपल्या फलंदाजी स्टाईलमध्ये कुठलाही बदल केला नाही. दरम्यान जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर त्याने खणखणीत षटकार मारला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या सामन्यातील १११ वे षटक टाकण्यासाठी जोफ्रा आर्चर गोलंदाजीला आला. या षटकातील सुरुवातीचे ३ चेंडू त्याने खेळून काढले. त्यानंतर चौथा चेंडू आर्चरने शॉर्ट टाकला. या चेंडूवर पंतने मिडविकेटच्या दिशेने दमदार षटकार मारला. जे पाहून जोफ्रा आर्चरलाही आश्चर्याचा धक्का बसला. त्याचा हा षटकार विक्रमी ठरला आहे. मोठ्या विक्रमात त्याने वीरेंद्र सेहवागची बरोबरी केली आहे.

मोठ्या विक्रमात वीरेंद्र सेहवागला संधी

ऋषभ पंतचा हा षटकार विक्रमी ठरला आहे. या षटकारासह तो भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. पंतने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत ९० षटकार मारले आहेत. या यादीत अव्वल स्थानी असलेल्या वीरेंद्र सेहवागने देखील ९० षटकार मारले आहेत. त्यामुळे भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो संयुक्तरित्या अव्वल स्थानी पोहोचला आहे. या यादीत रोहित शर्मा, एमएस धोनी आणि रवींद्र जडेजा यांचा देखील समावेश आहे. रोहित शर्माने आपल्या कसोटी कारकिर्दीत ८८ षटकार मारले होते. तर एमएस धोनीने ७८ षटकार मारले होते. रवींद्र जडेजाने आपल्या कसोटी कारकिर्दीत ७४ षटकार मारले आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऋषभ पंत -९० षटकार
वीरेंद्र सेहवाग -९० षटकार
रोहित शर्मा – ८८ षटकार
एमएस धोनी -७८ षटकार
रवींद्र जडेजा -७४ षटकार