भारताचा नवा कसोटी उपकर्णधार ऋषभ पंतनेही इंग्लंड दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात शतक झळकावत भारताची धावसंख्या ४००च्या नेली आहे. ऋषभ पंतने आपला आक्रमक अंदाज कायम ठेवत फलंदाजी केली. वेळप्रसंगी त्याने सावध फलंदाजी करत धावा काढतही आपल्या धावसंख्येत भर घातली.

ऋषभ पंतने १४६ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांसह १०५ धावा करत आपलं शतक पूर्ण केलं. ऋषभ पंतने शोएब बशीरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर षटकार लगावत ऐटीत आपलं शतक पूर्ण केलं. पंतने त्याचं शतक पूर्ण करताच त्याने हेल्मेट काढत हात हवेत उंचावले. यानंतर त्याने हेल्मेट, बॅट मैदानावर ठेवली, ग्लोव्ह्ज काढले आणि कोलांटी उडी घेत आपल्या शतकाचा आनंद साजरा केला. यानंतर त्याने जाऊन गिलला मिठी मारली. पुन्हा आपल्या क्रीझमकडे परतताना आकाशाकडे पाहत त्याने देवाचे आभार मानले. पंतच्या या सेलिब्रेशनचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

पहिल्या दिवसाच्या अखेरीस ऋषभ पंत ६५ धावांवर नाबाद होत माघारी परतला. दुसऱ्या दिवसाच्या सुरूवातीला फार मोठे फटके न खेळत बदललेल्या खेळपट्टीचा अंदाज घेत फलंदाजी केली. बेन स्टोक्सबरोबर मजा मस्ती शाब्दिक युद्ध सुरू असताना त्याने लक्षपूर्वक आपला डाव पुढे नेला.

सचिन तेंडुलकरने भारताच्या पहिल्या दिवसाचा खेळ झाल्यानंतर पोस्ट शेअऱ करत भारतीय संघाचं कौतुक केलं होतं. यादरम्यान त्याने २००२मधील इंग्लंड दौऱ्यातील लीड्सच्या मैदानावरील कसोटीचा उल्लेख केला आणि या सामन्यात तिसरा शतकवीर खेळाडू कोण असेल असा प्रश्न विचारला होता. आता ऋषभ पंतने शतक करत सचिन तेंडुलकरच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऋषभ पंतचं हे सातवं शतक होतं. या शतकासह त्याने एम एस धोनीला मागे टाकलं आहे आणि भारताकडून सर्वाधिक शतकं झळकावणारा तो विकेटकिपर फलंदाज ठरला आहे.