Rishabh Pant shared a special message on Instagram story for team India: लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर डब्ल्यूटीसी फायनल सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले आहेत. या सामन्यातील पहिल्या दोन दिवसाचा खेळ पार पडला आहे. पहिल्या दोन दिवसात ऑस्ट्रेलिया संघाने सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली आहे.तसेच भारतीय संघ ३१८ धावांनी पिछाडीवर आहे. अशात भारतीय संघासाठी ऋषभ पंतने एक खास संदेश शेअर केला आहे.

टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पिछाडीवर आहे. मात्र ऋषभ पंत नेहमीप्रमाणेच सकारात्मक आहे आणि टीम इंडिया पुन्हा मुसंडी मारेल आणि सामना जिंकेल, अशी आशा त्याने इमोजीद्वारे व्यक्त केली आहे. याबाबात ऋषभ पंतने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्याने शेअर स्टोरीमध्ये सामना पाहतानाचा व्हिडीओ केला आहे. त्याचबरोबर भारतीय संघाला मेन्शन करतान दोन इमोजीही शेअर केले आहेत.

IND vs NZ Anil Kumble Lashes Out At Rohit Sharma and Gautam Gambhir
IND vs NZ : ‘तुम्ही फलंदाजांना दोष देऊ नका…’, मालिका गमावल्यानंतर अनिल कुंबळे रोहित-गौतमवर संतापले
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
IND vs NZ Harbhajan Singh Statement
IND vs NZ : ‘भारतासाठी ‘ती’ गोष्ट शत्रू ठरतेय…’, मायदेशात पहिल्यांदाच कसोटीत व्हाइट वॉश झाल्यानंतर हरभजन सिंगचे मोठे वक्तव्य
IND vs NZ Tom Latham Statement After India clean sweep
IND vs NZ : ‘आम्ही भारतीय संघाच्या खेळण्याच्या पद्धतीबद्दल…’, ऐतिहासिक मालिका विजयानंतर टॉम लॅथमने सांगितले किवीच्या यशाचे गुपित
IND vs NZ Five Reasons for India Defeat
IND vs NZ : भारतीय संघावर का ओढवली मायदेशात मालिका पराभवाची नामुष्की?
IND vs NZ India broke the embarrassing record of 50 years ago
IND vs NZ : भारताचा ५० वर्षांनंतर मायदेशात पहिल्यादांच नकोसा विक्रम, काय आहे ही नामुष्की? जाणून घ्या
IND vs NZ India Lost 3 Wickets in Just 9 Balls Yashasvi Jaiswal Bowled Virat Kohli Suicidal Run Out on Day 1 of Mumbai test
IND vs NZ: ९ चेंडूत ३ विकेट्स आणि टीम इंडियाची हाराकिरी, रोहित-विराटने पुन्हा केलं निराश
Mukesh Kumar sensational 6 for 46 helps India A bowl Australia A out for 195 Runs INDA vs AUSA
INDA vs AUSA: मुकेश कुमारने ६ विकेट्स घेत केला कहर, ऑस्ट्रेलिया अ १९५ वर ऑलआऊट; भारतीय अ संघाने दुसऱ्या दिवशीच घेतला बदला
ऋषभ पंतची इन्स्टाग्राम स्टोरी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या २०२१-२३ सायकल दरम्यान पंत हा भारताचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू राहिला आहे. त्याने अनेक मालिकांमध्ये आपल्या संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. १२ सामन्यांत त्याने ४३.४० च्या सरासरीने ८६८ धावा केल्या. त्याची सर्वोत्तम धावसंख्या १४६ धावा होती. यादरम्यान त्याच्या बॅटमधून दोन शतके आणि पाच अर्धशतकेही झळकली. ऋषभ पंतने आतापर्यंत कसोटी चॅम्पियनशिपमध्ये एकूण २४ सामने खेळले आहेत. त्यापैकी ४१ डावांमध्ये ४१.४४ च्या सरासरीने १५७५ धावा केल्या आहेत. त्याने तीन शतके आणि नऊ अर्धशतकेही झळकावली आहेत.

हेही वाचा – IND vs AUS WTC 2023 Final: लवकर आऊट झाल्यानंतर चाहत्यांनी विराटला केले ट्रोल, फोटो शेअर करताना म्हणाले…

डब्ल्यूटीसी फायनल सामन्यात भारत पिछाडीवर –

कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत पिछाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ४६९ धावा केल्या. स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांनी उत्कृष्ट शतके झळकावली. प्रत्युत्तरात भारताने ५ विकेट गमावून १५१ धावा केल्या आहेत. टीम इंडिया अजूनही ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येपेक्षा ३१८ धावांनी मागे आहे. फॉलोऑन टाळण्यासाठी भारताला २६९ धावा करायच्या आहेत. आता भारतीय संघाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी अजिंक्य रहाणे आणि केएस भरत यांच्यावर आहे.