Rishabh Pant Viral Video IND vs NZ: भारत-न्यूझीलंडमध्ये दुसरा कसोटी सामना पुण्यात खेळवला जात आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वॉशिंग्टन सुंदरच्या ७ विकेट्स आणि रविचंद्रन अश्विनच्या ३ विकेट्सच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला पहिल्याच दिवशी २५९ धावांवर सर्वबाद केले., त्याला प्रत्युत्तरात भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत १बाद १६ धावा केल्या. यादरम्यान यष्टीरक्षण करत असतानाचा ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदरचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.

वॉशिंग्टन सुंदरला २०२१ नंतर पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटमध्ये संधी मिळाली आणि त्याने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने आपल्या भेदक गोलंदाजीने पाहुण्या संघाला फार काळ मैदानावर टिकू दिले नाही. रचिन रवींद्रला बाद करून वॉशिंग्टन सुंदरने पुणे कसोटीतील पहिली विकेट घेतली. रचिनला क्लीन बोल्ड करत त्याने भारताला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. यानंतर सुंदर न्यूझीलंडला सर्वबाद करून शांत बसला, यादरम्यान त्याने ७ विकेट्स घेतल्या.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा – IND vs NZ: अश्विन-सुंदरची जोडी जमली रे! टीम इंडियाने घडवला इतिहास, १४७ वर्षांच्या कसोटी इतिहासात पहिल्यांदाच घडली अशी गोष्ट

न्यूझीलंडच्या पहिल्या डावात, एजाज पटेल वॉशिंग्टन सुंदरच्या षटकात फलंदाजी करत होता. यष्टीरक्षक विकेटच्या मागे असल्याने फलंदाजाची खेळण्याची शैली सर्वात जवळून पाहू शकतो, यावरूनच अनेकदा यष्टीरक्षक गोलंदाजाला कुठे चेंडू टाकल्यास फायदा होईल हे सांगताना पाहिलंय. ऋषभ पंत विकेटच्या मागे उभा होता आणि तिथून त्याने वॉशिंग्टन सुंदरला हाक मारली आणि सांगितलं की, “वॉशी (वॉशिंग्टन सुंदर) चेंडू थोडा पुढे टाकू शकतो…” यानंतर एजाज पटेलने पुढच्याच चेंडूवर समोरच्या बाजूला चौकार मारला. हा चौकार पाहून ऋषभ पंत म्हणाला, ‘मला कसं काय माहित त्याला हिंदी समजते.’

हेही वाचा – बाळाच्या जन्माची माहिती मिळताच सामना अर्धवट सोडून गेला क्रिकेटपटू अन् मग…, क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडला असा अनोखा प्रसंग

ऋषभ पंतला चौकार पाहून कळलं की एजाज पटेलला कळलं होतं की सुंदर कसा चेंडू टाकणार आहे. त्यामुळे एजाजने समोरच्या बाजूने एक चौकार लगावला. न्यूझीलंडचा हा फिरकीपटू एजाज पटेलही भारतीय वंशाचा असून मुळचा मुंबईचा आहे, त्यामुळे हिंदी त्याला चांगलीच समजते. पण याचा अंदाज पंतला आला नाही आणि त्याने लगेच हिंदीत बोलत सुंदरबरोबर त्याला बाद करण्याची योजना आखली. यानंतर पंत खेळाडूंबरोबर बोलताना त्याचा आवाज स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाला होता. यानंतर आता हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

तीन वर्षांहून अधिक कालावधीनंतर कसोटी सामना खेळणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने २३.१ षटकांत ५९ धावा देत सात विकेट घेतले. अशाप्रकारे सुंदरने कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच एका डावात पाच किंवा त्याहून अधिक विकेट घेण्याचा पराक्रम केला. याआधी, सुंदरची सर्वोत्तम कामगिरी ८९ धावांत ३ विकेट अशी होती.

हेही वाचा – Washington Sundar : ‘आजचा दिवस कधीही विसरु शकणार नाही कारण…’, शानदार गोलंदाजीनंतर वॉशिंग्टन सुंदरने ‘या’ व्यक्तीला दिले श्रेय

बेंगळुरू कसोटी गमावल्यानंतर पुनरागमन करण्यासाठी सज्ज असलेल्या टीम इंडियाने पुणे कसोटीच्या पहिल्याच दिवशी दमदार कामगिरी केली. भारतीय कसोटी इतिहासात संघाच्या दोन्ही ऑफस्पिन गोलंदाजांनी १० विकेट घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. न्यूझीलंडने सकाळी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लंच ब्रेकपर्यंत न्यूझीलंडने दोन गडी गमावून ९२ धावा केल्या होत्या. दुसऱ्या सत्रात किवी संघाने तीन गडी गमावले आणि त्यांची धावसंख्या २०१ पर्यंत पोहोचली, पण तिसऱ्या सत्रात त्यांचा डाव भारतीय गोलंदाजांनी उधळून लावला. सध्या भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर पहिल्या सत्रात ३ बाद ६८ धावा केल्या आहेत.

Story img Loader