scorecardresearch

“हे माझ्यासाठी…” धोनीशी तुलना झाल्यानंतर ऋतुराज गायकवाडचे स्पष्टीकरण

आयपीएल २०२१ च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या ऋतुराज गायकवाडने इतिहास रचला आहे.

“हे माझ्यासाठी…” धोनीशी तुलना झाल्यानंतर ऋतुराज गायकवाडचे स्पष्टीकरण

आयपीएल २०२१ च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या ऋतुराज गायकवाडने इतिहास रचला आहे. या हंगामात ऋतुराज गायकवाड उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता आणि त्याने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध फलंदाजी करताना ऑरेंज कॅपही जिंकली. ऋतुराज गायकवाडने पंजाब किंग्जच्या केएल राहुलला मागे टाकत या मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. केएल राहुलने या मोसमात एकूण ६२६ धावा केल्या आहेत. तर ऋतुराजने ६३५ धावा केल्या.

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात  ऋतुराज गायकवाडने झटपट सुरुवात करत ३२ धावा केल्या. ऋतुराज ऑरेंज कॅप जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.

सामन्यादरम्यान सुरेश रैना आणि रॉबिन उथप्पा यांनी ऋतुराजच्या शांत स्वभावाची तुलना एमएस धोनीशी केली. मात्र ऋतुराजला यावर विश्वास बसला नाही. ऋतुराजने इंडीया टूडेशी बोलतांना सांगितले की, हे माझ्यासाठी आश्चर्यजनक आहे. सीएसके स्टार म्हणाला की, त्याला त्याच्या वरिष्ठ सहकाऱ्यांवर रैना आणि उथप्पावर ( धोनीशी तुलना केल्याबाबत) विश्वास ठेवायचा नाही. यावेळी ऋतुराजने आतापर्यंत ज्यामुळे यश मिळवले आहे तेच करत राहण्याचा प्रयत्न करेल यावर जोर दिला.

सोशल मीडियाचा वापर टाळण्याचा सल्ला

ऋतुराज म्हणाला, एमएस धोनीने त्याला सोशल मीडियाचा वापर टाळण्याचा सल्ला दिला. “मला ते चांगले वाटते. तसेही मला सहसा आवडत नाही. मी सोशल मीडिया व्यक्ती नाही. मला फक्त माझ्या क्रिकेटबद्दल पोस्ट करायचे असते.” असे ऋतुराज म्हणाला.

“श्रीलंकेला गेल्यानंतर आणि मला भारताची कॅप मिळाल्यानंतर यूएईच्या लेगवर येण्याने माझा आत्मविश्वास वाढला. यामुळे माझ्या देहबोलीला मदत झाली आणि माझ्या खेळाला मदत झाली,” असे ऋतुराज म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-10-2021 at 15:13 IST

संबंधित बातम्या