भारतीय क्रिकेट संघातील आक्रमक खेळाडू रॉबिन उथप्पाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने ट्वीट करत एक निवदेन जारी केले आहे. मला भारतासाठी आणि कर्नाटकसाठी खेळल्याचा अभिमान आहे, असं त्याने या निवेदनात म्हटले आहे. उथप्पाने २००६ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तसेच २००७ साली झालेल्या टी-२० विश्वचषकात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

हेही वाचा – आगामी टी २० विश्वचषकाच्या आधी ऑस्ट्रेलियन संघाला लागले दुखापतींचे ग्रहण

ट्वीट करत दिली माहिती

“गेली २० वर्ष मी क्रिकेट खेळतो आहे. यादरम्यान, मला भारतासाठी आणि कर्नाटकसाठी खेळायची संधी मिळाली, याचा मला अभिमान आहे. या २० वर्षात मी अनेक चढ-उतार पाहिले आहेत. मात्र, प्रत्येक गोष्टीचा अंत असतोच, त्याप्रमाणे मी आज सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. माझ्या संपूर्ण कारकिर्दीदरम्यान, मला पाठिंबा देणारे, बीसीसीआयचे अध्यक्ष, कर्मचारी, संघातील सहकारी, माझे प्रशिक्षक, आयपीएल संघ तसेच कर्नाटक क्रिकेट या सर्वांचे मी आभार मानतो”, असे त्याने निवेदनात म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टी-२० विश्वचषकात महत्त्वाची भूमिका

रॉबिन उथप्पाने २००६ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तसेच तो २००७ साली झालेल्या टी-२० विश्वचषक संघाचा सदस्यही होता. या विश्वचषकात त्याने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने पाकिस्तानविरूद्धच्या बॉल आऊटमध्ये गेलेल्या सामन्यात भारताला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर प्रेक्षकांना केलेल्या अभिवादनाने सर्व क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली होती. उथप्पाने भारतासाठी ४६ एकदिवसीय आणि १३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्याने ९३४ धावा केल्या. तसेच त्याने ६ अर्धशतकही झळकावले आहेत. तर टी-२० मध्ये त्याने एका अर्धशतकासह २४९ धावा केल्या आहेत.