माजी कर्णधार एमएस धोनी भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने तीनदा आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. यादरम्यान त्याने अनेक खेळाडूंना मार्गदर्शन केले आणि काही खेळाडूंसाठी तो आदर्श ठरला. धोनीसोबत अनेक वेळा खेळलेल्या क्रिकेटपटूंनी धोनीशी संबंधित अनेक रंजक गोष्टी उघड केल्या आहेत. अशात त्यापैकी एक असलेल्या रॉबिन उथप्पाने जिओ सिनेमाच्या शोमध्ये धोनीच्या सुरुवातीच्या दिवसांचा किस्सा शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्याबद्दल कदाचितच काही लोकांनाच माहिती असेल. त्याच वेळी, संघाचा स्टार फलंदाज रॉबिन उथप्पाने जिओ सिनेमाच्या शोमध्ये एमएस धोनीच्या सुरुवातीच्या दिवसांचा किस्सा शेअर केला आहे, जेव्हा तो संघात स्थान मिळवण्यासाठी खूप मेहनत करत होता. तेव्हापासून तो त्याच्या आहाराबाबत खूप कठोर होता.

रॉबिन उथप्पा आणि एमएस धोनी जवळपास दोन दशकांपासून एकमेकांना ओळखतात. उथप्पाने धोनीला जवळून दिग्गज बनताना पाहिले आहे. उथप्पा म्हणाला, “त्याचा साधेपणा असा आहे जो नेहमीच असतो आणि तो कधीही बदलला नाही. तो आजही पहिल्या दिवसासारखाच आहे. धोनी हा जगातील सर्वात साधा माणूस आहे.”

हेही वाचा – IPL 2023: रोहित शर्माला मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद कसे मिळाले? अनिल कुंबळेंनी केला मोठा खुलासा

भारताच्या माजी फलंदाजाने २००३ मध्ये पहिल्यांदा धोनीला भेटल्याची कहाणी सांगितली. तो म्हणाला, “मी पहिल्यांदा धोनीला २००३ मध्ये बंगळुरूमधील एनसीएच्या इंडिया कॅम्पमध्ये पाहिले होते. एमएस धोनी फलंदाजी करत होता आणि लांब षटकार मारत होता. त्याने शेवटी एस श्रीरामलाही जखमी केले. श्रीराम त्याला गोलंदाजी करत होता.”

रॉबिन पुढे म्हणाला, “त्यावेळी धोनी पुढे सरसावला आणि चेंडू जोरात मारला. श्रीरामने चेंडूला अडवण्यासाठी हात आडवा घातला. परंतु चेंडू हाताला स्पर्श करुन गेला. त्यानंतर श्रीराम १०-२० यार्ड मागे गेला. आम्हाला वाटले की श्रीराम चेंडूच्या मागे धावत आहे, पण तो चेंडू सोडून थेट ड्रेसिंग रूममध्ये गेला. कारण त्याची दोन बोटे मोडली होती. एमएस धोनीमध्ये किती ताकद आहे, हे आम्हाला पाहायचे होते आणि हे स्फोटक होते. त्यावेळी मला माहित झाले होते की तो भारताकडून खेळणार आहे. तो खास फलंदाज आहे.”

हेही वाचा – WPL 2023 MI vs UPW: यास्तिका भाटियाला सूर्यकुमारसारखा शॉट खेळणे पडले महागात, अंजलीने केले क्लीन बोल्ड

उथप्पा म्हणाला, “आम्ही एकत्र जेवायचो. आमचा ग्रुप मी, सुरेश रैना, इरफान पठाण, आरपी सिंग, चावला, मुनाफ आणि धोनी होतो. आम्ही दाल मखनी, बटर चिकन, जीरा आलू गोभी आणि रोटी ऑर्डर करायचो. पण जेव्हा अन्नाचा प्रश्न येतो तेव्हा एमएस एक अतिशय कठोर व्यक्ती आहे. तो बटर चिकन खाईल पण चिकनशिवाय. फक्त ग्रेव्ही सह. जेव्हा तो चिकन खातो तेव्हा तो रोटी खाणार नाही.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robin uthappa told the story of ms dhonis diet 20 years ago vbm
First published on: 18-03-2023 at 20:01 IST