Rohan Bopanna Becomes Oldest Player To Reach US Open Final: यूएस ओपन २०२३ मधून भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा जोडीदार ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू एबडेन यांनी गुरुवारी यूएस ओपनच्या पुरुष दुहेरीची अंतिम फेरी गाठली. यासोबतच रोहन बोपण्णाने इतिहास रचला. त्याने विश्वविक्रमही केला. रोहनपूर्वी, या वयात (४३ वर्षे ६ महिने) इतर कोणत्याही पुरुष खेळाडूने (एकेरी किंवा दुहेरी) खुल्या युगात ग्रँडस्लॅम अंतिम फेरी गाठली नाही. एकूणच रोहनची अंतिम फेरी गाठणे ऐतिहासिक आहे.

रोहन आणि एब्डेन यांनी पियरे ह्युग्स हर्बर्ट आणि निकोलस माहुत या फ्रेंच जोडीवर सरळ सेटमध्ये विजय नोंदवला. बोपण्णा कारकिर्दीत दुसऱ्यांदा ग्रँडस्लॅम पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारण्यात यशस्वी ठरला आहे. सहाव्या मानांकित भारतीय-ऑस्ट्रेलियन जोडीने यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती.

IPL 2024 RR vs PBKS Match Updates in marathi
PBKS vs RR : युजवेंद्र चहलला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! IPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरणार पहिलाच गोलंदाज
d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत
Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज

या जोडीने यूएस ओपनच्या उपांत्य फेरीत फ्रेंच जोडीचा ७-६ (७-३), ६-२असा पराभव केला. बोपण्णा ग्रँडस्लॅम पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची ही दुसरी वेळ आहे, त्याने शेवटचा २०१० मध्ये त्याचा पाकिस्तानी साथीदार इसम-उल-हक कुरेशीसह यूएस ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर कुरेशीसह रोहनची जोडी ब्रायन बंधूंकडून हरली. रोहन बोपण्णा शुक्रवारी कारकिर्दीतील दुसरा ग्रँडस्लॅम फायनल खेळणार आहे. तो ग्रँडस्लॅम फायनल हार्ड कोर्टवर खेळेल हा योगायोग आहे.

हेही वाचा – VIDEO: क्रिकेटनंतर एमएस धोनीने ‘या’ खेळात आजमावला हात, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत खेळला सामना

१३ वर्षांपूर्वीच्या आठवणी झाल्या ताज्या –

सामना जिंकल्यानंतर रोहन बोपण्णा खूप आनंदी दिसत होता. तो म्हणाला, “जेव्हा आम्ही पहिल्या सेटमध्ये दुहेरी ब्रेकने मागे पडू नये म्हणून ब्रेक पॉइंट वाचवल्यानंतर टिकून राहिलो, तेव्हा ते खूप महत्त्वाचे होते. आम्हाला लोकांकडून खूप ऊर्जा मिळाली. मी १३ वर्षांनंतर अंतिम फेरीत परतलो आहे. म्हणून मी खूप आनंदी आहे.”

बोपण्णा २०१७ मध्ये फ्रेंच ओपनचा मिश्र दुहेरीचा आहे विजेता –

रोहन बोपन्ना २०१७ मध्ये फ्रेंच ओपन मिश्र दुहेरीचा चॅम्पियन आहे, परंतु बोपण्णाने अद्याप एकही ग्रँडस्लॅम पुरुष दुहेरीचे विजेतेपद जिंकलेले नाही. ४३ वर्षे आणि सहा महिने वयाचा, रोहन बोपण्णा खुल्या गटाक ग्रँड स्लॅम अंतिम फेरीत पोहोचणारा सर्वात वयस्कर खेळाडू बनला आहे. त्याने कॅनडाच्या डॅनियल नेस्टरचा विक्रम मोडला, जो २९१६ ऑस्ट्रेलियन ओपनचा अंतिम सामना खेळला तेव्हा ४३ वर्षे आणि चार महिन्यांचा होता.

हेही वाचा – मेसी, हालँडचा समावेश; रोनाल्डोला वगळले; फुटबॉलविश्वातील प्रतिष्ठेच्या बॅलन डी’ओर पुरस्काराची नामांकन यादी जाहीर

राजीव राम आणि जो सॅलिसबरी जोडीशी होणार स्पर्धा –

यूएस ओपन २०२३ च्या पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत, बोपण्णा आणि एबडेन यांचा सामना तिसरा मानांकित अमेरिकेचा राजीव राम आणि ग्रेट ब्रिटनचा जो सॅलिसबरी यांच्याशी आर्थर अॅशे स्टेडियमवर होईल. राम आणि सॅलिस्बरी हे दोन वेळा यूएस ओपन पुरुष दुहेरीचे विजेते आहेत. बोपण्णा आणि एबडेन यांनी या वर्षात आतापर्यंत दोन विजेतेपद पटकावले आहेत. या जोडीने फेब्रुवारीमध्ये कतार ओपन आणि मार्चमध्ये इंडियन वेल्सचे विजेतेपद जिंकले. दोघांनीही जुलैमध्ये विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत धडक मारली होती. इंडियन वेल्समध्ये एटीपी मास्टर्स १००० विजेतेपद जिंकणारा रोहन बोपण्णा हा सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला होता.