scorecardresearch

रोहित, पंत, अश्विन कसोटी संघात

रोहितने मागील वर्षी ४७.६८च्या सरासरीने दोन अर्धशतकांसह एकूण ९०६ धावा केल्या.

rohit sharma

‘आयसीसी’च्या एकदिवसीय संघातही स्थान मिळवण्यात भारतीय खेळाडू अपयशी

दुबई :आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) गुरुवारी जाहीर केलेल्या वार्षिक कसोटी संघात भारताच्या रोहित शर्माने सलामीवीर, ऋषभ पंतने यष्टिरक्षक आणि रविचंद्रन अश्विनने एकमेव फिरकी गोलंदाज म्हणून स्थान मिळवले आहे. ट्वेन्टी-२० संघाप्रमाणेच एकदिवसीय संघातही स्थान मिळवण्यात भारतीय खेळाडू अपयशी ठरले आहेत.

रोहितने मागील वर्षी ४७.६८च्या सरासरीने दोन अर्धशतकांसह एकूण ९०६ धावा केल्या. भारताचा प्रथम पसंतीचा यष्टिरक्षक पंतने १२ कसोटी सामन्यांत ३९.३६च्या सरासरीने ७४८ धावा केल्या. याचप्रमाणे अश्विनने ९ सामन्यांत ५४ बळी मिळवले. कसोटी संघाचे नेतृत्व जागतिक कसोटी अजिंक्यपद विजेत्या न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनकडे सोपवले आहे.

कसोटी संघ

दिमुथ करुणारत्ने, रोहित शर्मा, मार्नस लबूशेन, जो रूट, केन विल्यमसन (कर्णधार), फवाद आलम, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, काइल जेमिसन, हसन अली, शाहीन आफ्रिदी

एकदिवसीय संघ

बाबर आझम (कर्णधार), मुशफिकुर रहीम (यष्टिरक्षक), फखर जमान, रासी व्हॅन डर डसन, शाकिब अल हसन, वानिंदू हसरंगा, मुस्ताफिजूर रेहमान, सिमी सिंग, दुष्मंता चमीरा.

मिताली, झुलन एकदिवसीय संघात

दुबई : ‘आयसीसी’च्या वार्षिक महिला एकदिवसीय संघात मिताली राज आणि झुलन गोस्वामी या अनुभवी खेळाडूंनी स्थान मिळवले आहे. ३९ वर्षीय मितालीने भारताचे कर्णधारपद सांभाळताना २०२१ मध्ये सहा अर्धशतकांसह एकूण ५०३ धावा केल्या. ३९ वर्षीय वेगवान गोलंदाज झुलनने मागील वर्षांत एकूण १५ बळी मिळवले.

महिला एकदिवसीय संघ  

लिझेल ली (दक्षिण आफ्रिका), अ‍ॅलिसा हिली (ऑस्ट्रेलिया), टॅमी ब्युमॉंट (इंग्लंड), मिताली राज (भारत), कर्णधार : हीदर नाइट (इंग्लंड), हेली मॅथ्यूज (वेस्ट इंडीज), मारिजाने कॅप ( दक्षिण आफ्रिका), शबनीम इस्माईल (दक्षिण आफ्रिका), फातिमा साना (पाकिस्तान), झुलन गोस्वामी (भारत), अनिसा मोहम्मद (वेस्ट इंडिज).

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rohit pant ashwin feature in iccs test team of year zws