Rohit Sharma Broke Sachin Tendulkar Biggest Record in ODI: भारतीय संघाचा सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानविरूद्ध सामन्यात एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावे केला आहे. रोहितने पाकिस्तानविरूद्ध सामन्यात फलंदाजीला उतरत खाते उघडताच मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. रोहितने २०१३ पासून नियमित सलामीवीर म्हणून खेळण्यास सुरुवात केली, तेव्हापासून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकापाठोपाठ एक मोठे विक्रम केले आहेत. रोहितने आता सलामीवीर म्हणून असा विक्रम केला आहे, ज्यात त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकलं आहे.

रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ही मोठी कामगिरी केली होती. रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात खाते उघडताच एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून ९ हजार धावा पूर्ण केल्या. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये केवळ १८१ डावात ९ हजार धावांचा टप्पा ओलांडला. रोहितने सर्वात कमी डावांमध्ये ९ हजार धावांचा आकडा गाठला आहे, जो एक नवा विश्वविक्रम केला आहे.

याआधी हा विक्रम भारतीय क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या नावावर होता, ज्याने ९ हजार धावांचा टप्पा १९७ डावांमध्ये गाठला होता. आता रोहित शर्माने हा विक्रम मोडून आपल्या नावावर केला आहे.

सचिनशिवाय रोहित शर्माने सौरव गांगुली, ख्रिस गेल, ॲडम गिलख्रिस्ट आणि सनथ जयसूर्यासारख्या दिग्गज सलामीवीरांनाही मागे टाकले आहे. सौरव गांगुलीने २३१ डाव, ख्रिस गेलने २४६ डाव, ॲडम गिलख्रिस्टने २५३ डाव आणि सनथ जयसूर्याने २६८ डावांमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून ९ हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

सलामीवीर म्हणून सर्वात जलद ९ हजार वनडे धावा करणारे फलंदाज

१८१ डाव – रोहित शर्मा<br>१९७ डाव – सचिन तेंडुलकर
२३१ डाव ​​– सौरव गांगुली
२४६ डाव – ख्रिस गेल
२५३ डाव – ॲडम गिलख्रिस्ट
२६८ डाव – सनथ जयसूर्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित शर्माने पाकिस्तानविरूद्ध सामन्यात वादळी सुरूवात केली पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. त्याने १५ चेंडूंत १३३.३३ च्या स्ट्राइक रेटने १ षटकार आणि ३ चौकारांसह २० धावा केल्या. शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर रोहित क्लीन बोल्ड झाला पण त्याने मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.