The ICC Awards of the Decade : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने याने आयसीसीच्या दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर मोहोर उमटवली आहे. जाणारा सर गॅरफिल्ड सोबर्स पुरस्कार आणि दशकातील सर्वोत्तम वन-डे क्रिकेटपटू असो दोन पुरस्कार विराट कोहलीने जिंकले आहेत. यानंतर भारतीय क्रिकेट संघाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन विराट कोहलीचं अभिनंदन करणारी पोस्ट टाकण्यात आली.

या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं होतं की, “दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटरसाठी सर गॅरफिल्ड सोबर्स पुरस्कार. दशकातील सर्वोत्तम वन-डे क्रिकेटपटू. गेल्या दशकात धावा, ट्रॉफी आणि जबरदस्त क्रमांक…खऱ्या अर्थाने चॅम्पिअन. विराट कोहलीचं अभिनंदन”

या पोस्टवर भारतीय क्रिकेट संघाचा तडाखेबाज फलंदाज रोहित शर्माने कमेंट केली आहे. विराट कोहलीने मिळवलेल्या यशाबद्दल रोहित शर्माने अभिनंदन केलं आहे. ‘मोठी कामगिरी’ केल्याचा उल्लेख रोहित शर्माने कमेंटमध्ये केला आहे.

विराट कोहलीने गेल्या दशकात सर्व फॉरमॅटमध्ये एकूण २० हजार ३९६ धावा केल्या आहेत. यामध्ये ६६ शतकांचा समावेश आहे. याशिवाय सर्वाधिक अर्धशतकंदेखील केली आहे. गेल्या १० वर्षात विराटने ९४ अर्धशतकं केली आहे. २०११ मध्ये भारताने जिंकलेल्या वर्ल्ड कप टीममध्येही विराट कोहली होता.