टीम इंडिया आज इंदूरच्या होळकर स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या अगोदर भारतीय संघाने मालिकेत २-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत रोहित आणि कंपनीकडे किवी संघाला क्लीन स्वीप करण्याची संधी आहे. रोहित शर्माने क्लीन स्वीप करण्याचा कारनामा केला, तर तो टीम इंडियाचा माजी फलंदाज गौतम गंभीरची बरोबरी करेल.

गंभीरच्या नेतृत्वाखाली भारताने क्लीन स्वीप केला –

१३ वर्षांपूर्वी गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पाच एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडचा ५-० असा क्लीन स्वीप केला होता. अशा परिस्थितीत रोहितकडे १३ वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आजचा एकदिवसीय सामना जिंकला तर १३ वर्षांनंतर भारतीय संघ पुन्हा एकदा न्यूझीलंडला क्लीन स्वीप करेल.

२०१० मध्ये रचला होता इतिहास –

२०१० मध्ये किवी संघ ५ वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी भारतीय संघाचे नेतृत्व गौतम गंभीरकडे होते. गंभीरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पाचही एकदिवसीय सामने जिंकले. १९८८ मध्येही भारताने न्यूझीलंडला ४ वनडे सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप केले होते. अशा परिस्थितीत आता रोहितलाही तीच संधी आहे. विशेष म्हणजे आजचा सामना जर भारतीय संघाने जिंकला तर वनडे क्रमवारीतही अव्वल स्थान मिळवेल.

दोन्ही संघांचे हेड टू हेड रेकॉर्ड –

भारत आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत ११५ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी भारतीय संघाने ५७ सामने जिंकले आहेत, तर ५० सामन्यांमध्ये किवींनी भारतीयांवर वर्चस्व राखले आहे. याशिवाय एक सामना टाय आणि ७ सामने अनिर्णित राहिले आहेत. आणि आज उभय संघांमधील ११६ वा एकदिवसीय सामना आहे.

हेही वाचा – IND vs NZ 3rd ODI: विराट कोहलीला दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवण्याची सुवर्णसंधी; त्यासाठी करावे लागणार फक्त ‘हे’ काम

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, उमरान मलिक</p>

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक/कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, लॉकी फर्ग्युसन, जेकब डफी, ब्लेअर टिकनर