Mohammed Kaif latest Interview : आयसीसी टूर्नामेंट्समध्ये ट्रॉफी जिंकून एक दशक पूर्ण झालं, पण नव्या टूर्नामेंटमध्ये भारताला विजय संपादन करण्यात अपयश आलं आहे. २०२३ मध्ये एम एस धोनीच्या नेतृत्वात भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. आयसीसी टूर्नामेंट्सच्या चार फायनलमध्ये आणि काही सेमी फायनलमध्ये गेल्या काही वर्षात भारताचा पराभव झाला. कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने चांगली कामगिरी केली होती. पण आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात मात्र अपयश आलं. रोहित शर्माच्या नेतृत्वातही टीम इंडियाला परभवाचा सामना करावा लागला. गतवर्षी झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.

तसंच नुकत्याच झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्येही टीम इंडियाचा पराभव झाला. अशा मोठ्या टूर्नामेंटमध्ये टीम इंडियाचा पराभव होत असल्याने यामागची कारण शोधली जात आहेत. भारतीय संघ महेंद्रसिंग धोनीचं नेतृत्व मिस करत आहे, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागल्या आहेत. परंतु, भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने रोहित शर्माच्या नेतृ्त्वाला पाठिंबा दिला आहे. भारताला ट्रॉफी जिंकवून देण्यासाठी रोहित शर्मा सक्षम असल्याचं कैफने म्हटलं आहे.

नक्की वाचा – टीम इंडियात पुनरागमनाबाबत पृथ्वी शॉने केलं मोठं विधान, म्हणाला, “मला पुजारासारखी फलंदाजी…”

कैफ माध्यमांशी बोलताना म्हणाला, धोनीनं खूप चांगली कामगिरी केली आहे. रोहित शर्मा आणि हे सर्व खेळाडू चांगले कर्णधार आहेत. तुमच्याकडे प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड असताना आणखी काय पाहिजे तुम्हाला? अशी प्रतिक्रिया कैफने डीडी इंडियाच्या ‘व्हर्च्युअल एन्काऊंटर्स’ या शोमध्ये दिली. आयीसीसी इव्हेंट्समध्ये धोनीनं अप्रतिम कामगिरी केली आहे. तुम्ही धोनीला मिस करत आहात, नक्कीच. पण मला असं वाटतं की, रोहित शर्मासारखा खेळाडू टीम इंडियाला पुढं नेऊ शकतो. आयसीसी इव्हेंट्स जिंकण्यासाठी त्याच्याकडे संघात चांगले खेळाडू आहेत. आयसीसीच्या टूर्नामेंटमध्ये संघनिवडीबाबत भारताने चूक केली. त्यामुळे विजयाचा आलेख घसरला. पण धोनीने त्या चुका केल्या नाहीत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांनी चुका केल्या आहेत. तुम्ही ऑस्ट्रेलियाला गेले. चहलच्या जागेवर अश्विनला संधी देण्यात आली. टी-२० मध्ये चहल योगदान देऊ शकला असता. तुम्ही चहलला बाहेर ठेवलं आणि अश्विनची निवड केली. त्यामुळे तुम्ही या सामान्य चूका केल्या. म्हणून तुम्ही धोनीबाबत बोलत असता. कारण पहिल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणत्या खेळाडूंनी खेळावं, हे धोनीला माहित असतं. खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवणं ही धोनीची खासीयत आहे. म्हणून टीम इंडिया धोनीला मिस करत असावी, असं मला वाटतं.