Rohit sharma and Wife Ritika Sajdeh Viral Video: भारतीय संघाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे. पहिला कसोटी पर्थमध्ये खेळवला जात असून भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत २१८ धावांची भक्कम आघाडी मिळवली आहे. यशस्वी जैस्वालला ऑस्ट्रेलियामध्ये पहिले शतक झळकावण्यासाठी १० धावांची गरज आहे तर केएल राहुल ६० धावा करून खेळत आहे. दरम्यान आता भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा मुंबईहून ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला असल्याचा व्हीडिओ समोर आला आहे.

रोहित-रितिका दुसऱ्यांदा आई-बाबा झाल्यानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले

वडिलांची जबाबदारी पार पाडल्यानंतर, भारतीय कसोटी संघाचा नियमित कर्णधार आता राष्ट्रीय कर्तव्यासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. रोहित शर्मा शनिवारी रात्री उशिरा मुंबई विमानतळावर दिसला जिथे पत्नी रितिकाही त्याला निरोप देण्यासाठी आली होती. जाण्यापूर्वी रितिकाने रोहितला मिठी मारली आणि नंतर त्याला निरोप दिला. दोघांचा हा भावुक करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. रितिका भारतीय संघाच्या प्रत्येक दौऱ्यावर रोहितबरोबर असते आणि स्टँडसमध्ये बसून संघाला चिअर करत असते. पण यावेळेस मात्र रितिका रोहितबरोबर नसणार आहे.

हेही वाचा – IND vs AUS: यशस्वी जैस्वालचा विश्वविक्रम, कसोटीत एका कॅलेंडर वर्षात ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज

रितिका सजदेह आणि रोहित शर्मा १५ नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा आईबाबा झाले. त्याची पत्नी रितिका यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. रोहित शर्माला आधीच एक मुलगी आहे. दुसऱ्यांदा बाबा झालेला रोहित शर्मा मुलाच्या जन्मामुळे भारतीय संघाबरोबर पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाला जाऊ शकला नाही. रोहित शर्मा आणि रितिका दुसऱ्यांदा आई-बाबा झाल्यानंतर पहिल्यांदाच या व्हीडिओच्या माध्यमातून दिसले.

भारतीय संघ १० आणि ११ नोव्हेंबरला दोन गटात ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातही रोहित शर्मा खेळू शकला नाही आणि त्याच्या जागी संघाचे नेतृत्व वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह करत आहे.

हेही वाचा – IND vs AUS: “तू खूप स्लो बॉलिंग…’, यशस्वी जैस्वालने मिचेल स्टार्कला डिवचत झळकावलं शानदार अर्धशतक, पाहा VIDEO

ऑस्ट्रेलियाला पोहोचल्यानंतर रोहित शर्मा थेट पर्थमध्ये भारतीय संघात सामील होईल. पहिला कसोटी सामना संपल्यानंतर रोहित शर्मा सराव सामना खेळताना दिसणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यानंतर, भारतीय क्रिकेट संघ प्राईम मिनिस्टर इलेव्हन संघाविरुद्ध सराव सामना खेळेल आणि त्यानंतर दुसरा कसोटी सामना दिवस-रात्र खेळला जाईल. दुसरा कसोटी सामना हा अॅडलेडमध्ये खेळवला जाईल.

हेही वाचा – IND vs AUS: विराट कोहलीने रचला चक्रव्यूह अन् हर्षित राणाची भेदक गोलंदाजी, भारताला लायन-स्टार्कची अशी मिळाली विकेट

View this post on Instagram

A post shared by Rohitions45 (@rohsh45)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पर्थ येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने आपले दबदबा तयार केला आहे. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत १५० धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ केवळ १०४ धावाच करू शकला. ऑस्ट्रेलियाची पहिल्या डावातील ही भारतीय संघाविरूद्ध सर्वात कमी धावसंख्या आहे. अशा प्रकारे भारतीय संघाला पहिल्या डावात४६ धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात टीम इंडियाने दुसऱ्या दिवसाच्या खेळात एकही विकेट न गमावता १७२ धावा केल्या, त्यामुळे टीम इंडियाची आघाडी २१८ धावा झाली आहे.