Rohit Sharma eyes on Chris Gayle’s record of most sixes: भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा आधुनिक युगातचा जगातील दिग्गज फलंदाजांमध्ये गणला जातो. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने २०१३ मध्ये रोहित शर्माला सलामीवीर म्हणून पदोन्नती दिली. त्यानंतर त्याची कारकीर्द खूप बदलली आणि मोठ्या प्रमाणात बहरली. तेव्हापासून, रोहितने सर्व फॉरमॅटमध्ये आपल्या अप्रतिम खेळीने सर्वांना प्रभावित केले आहे. तांत्रिकदृष्ट्या दणदणीत फलंदाज असण्याबरोबरच, रोहित त्याच्या षटकारण मारण्याच्या क्षमतेसाठीही ओळखला जातो.
भारतीय कर्णधार सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर असलेल्या वेस्ट इंडिजच्या महान ख्रिस गेलची बरोबरी करण्यापासून तो फक्त १४ षटकार दूर आहे. दरम्यान, रोहित शर्माला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक षटकारांचा विश्वविक्रम मोडण्याच्या शक्यतेबाबत विचारण्यात आले.
ख्रिस गेलच्या विक्रमावर रोहित शर्माची नजर –
त्याला प्रत्युत्तर देताना तो म्हणाला की, जर तो मोडण्यात यशस्वी झाला तर हा एक अनोखा विक्रम असेल. विमल कुमारसोबत त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “जर मी हा विक्रम मोडू शकलो, तर हा एक अनोखा विक्रम असेल. मी माझ्या आयुष्यात कधीच विचार केला नव्हता की एक दिवस मी ख्रिस गेलचा विक्रम मोडू शकेन. हे मजेदार आहे पण ठीक आहे.”
हेही वाचा – World Cup 2023: आयसीसीने विश्वचषकासाठी सामना अधिकाऱ्यांची यादी केली जाहीर, पाहा भारताकडून कोणाला मिळाली संधी
उल्लेखनीय म्हणजे, रोहितने ४४६ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५३९ षटकार मारले असून ख्रिस गेलनंतर तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. ज्याने ४८३ सामन्यांमध्ये ५५३ षटकार लगावले आहेत. भारतीय कर्णधार एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या अखेरीस तो हा विक्रम आपल्या नावावर करेल अशी अपेक्षा आहे. याशिवाय, तो टी-२० मध्ये सर्वाधिक षटकार (१८२) आणि एकदिवसीय (२८०) मध्ये सर्वाधिक षटकारांच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे.
हेही वाचा – Rohit Sharma: फलंदाजीबद्दल विराट कोहलीशी काय चर्चा होते? याबाबत रोहित शर्माने केला खुलासा
याच मुलाखतीत रोहित शर्मालाही विचारण्यात आले की, त्याचे १०० कसोटी सामने खेळण्याचे ध्येय आहे का? याला उत्तर देताना हिटमॅन म्हणाला, “मी अशाप्रकारे फार पुढे जाण्याचा विचार करत नाही. मी अशा लोकांपैकी नाही जे खूप पुढचा विचार करतात, सध्या माझे लक्ष आशिया चषक आणि विश्वचषक २०२३ स्पर्धेवर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धही आमची मायदेशात छोटी मालिका आहे. त्यामुळे माझे लक्ष या सर्व गोष्टींवर आहे. म्हणूनच मी सध्या या गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रित करत आहे.”