Names of Match Officials Announced for World Cup Matches: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ८ सप्टेंबर रोजी आगामी आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ साठी सामना अधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. तथापि, आयसीसीने सध्या आगामी एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या साखळी टप्प्यात कामगिरी करणार्‍या सामना अधिकार्‍यांची यादी प्रसिद्ध केली आहे, तर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठीच्या सामन्या अधिकार्‍यांची नावे लवकरच जाहीर केली जातील. आयसीसीने क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या साखळी टप्प्यासाठी २० सामना अधिकाऱ्यांची निवड केली आहे.

या यादीत १६ अम्पायर्स आणि चार मॅच रेफरींचा समावेश आहे. यापैकी १२ जण आयसीसी पंचांच्या एमिरेट्स एलिट पॅनेलमधील आहेत. ते आहेत क्रिस्टोफर गॅफनी (न्यूझीलंड), कुमार धर्मसेना (श्रीलंका), मरायस इरास्मस (दक्षिण आफ्रिका), मायकेल गफ (इंग्लंड), नितीन मेनन (भारत), पॉल रीफेल (ऑस्ट्रेलिया), रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड), रिचर्ड केटलबरो (इंग्लंड), रॉडनी टकर (ऑस्ट्रेलिया), अहसान रझा (पाकिस्तान), एड्रियन होल्डस्टॉक (दक्षिण आफ्रिका) आणि जोएल विल्सन (वेस्ट इंडिज).

Shubman Gill Angry At Third Umpire's Decision
RR vs GT : तिसऱ्या पंचांच्या ‘त्या’ निर्णयानंतर शुबमन गिल मैदानावरील पंचांवर संतापला, VIDEO होतोय व्हायरल
Wakad Police Arrest 10 for IPL Betting Extortion through Betting
पिंपरी : आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटिंग; दहा जण अटकेत
Virat Kohli and Rachin Ravindra Video Viral
CSK vs RCB : सामन्यादरम्यान कोहलीने पुन्हा उत्साहात गमावले भान, रचिन बाद झाल्यावर अशी दिली प्रतिक्रिया, पाहा VIDEO
India Australia first Test match likely to be held in Perth sport news
भारत- ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी पर्थला?

विश्वचषक २०२३ मध्ये जवागल श्रीनाथ असणार सामनाधिकारी –

आयसीसी उदयोन्मुख पंच पॅनेलमधील उर्वरित चार शराफुद्दौला इब्ने शाहिद (बांगलादेश), पॉल विल्सन (ऑस्ट्रेलिया), अॅलेक्स व्हार्फे (इंग्लंड) आणि ख्रिस ब्राउन (न्यूझीलंड) आहेत. दरम्यान, २०१९ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत काम करणारे तीन पंच देखील आगामी विश्वचषक स्पर्धेचा भाग आहेत. ते आहेत कुमार धर्मसेना, रॉड टकर आणि मराइस इरास्मस. दुसरीकडे, जेफ क्रो (न्यूझीलंड), अँडी पायक्रॉफ्ट (झिम्बाब्वे), रिची रिचर्डसन (वेस्ट इंडीज) आणि जवागल श्रीनाथ (भारत) हे आगामी एकदिवसीय विश्वचषक २०२३ साठी चार आयसीसी एलिट पॅनेल ऑफ मॅच रेफ्री आहेत.

हेही वाचा – Asia Cup 2023: भारत-पाक सामन्यासाठी पीसीबीने घेतला मोठा निर्णय! सुपर फोरमधील सामना पावसामुळे वाया गेला, तर ‘असा’ लागणार निकाल

आगामी मेगा स्पर्धेत नितीन मेनन आणि कुमार धर्मसेना मैदानावरील पंच असतील याची पुष्टीही आयसीसीने केली आहे. पॉल विल्सन हे टीव्ही पंच, शरफुद्दौला इब्ने शाहिद हे चौथे पंच आणि अँडी पायक्रॉफ्ट सामनाधिकारी असतील.

हेही वाचा – Glenn McGrath: ऑस्ट्रेलियाच्या माजी गोलंदाजाच्या घरात घुसलेल्या अजगराने केला हल्ला, नंतर काय झालं? पाहा VIDEO

विश्वचषक २०२३ च्या साखळी टप्प्यातील सामना अधिकाऱ्यांची यादी –

पंच: कुमार धर्मसेना, मराइस इरास्मस, ख्रिस गॅफनी, मायकेल गॉफ, एड्रियन होल्डस्टॉक, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबरो, नितीन मेनन, अहसान रझा, पॉल रीफेल, शराफुद्दौला इब्न शैद, रॉड टकर, अॅलेक्स व्हार्फ, जोएल विल्सन आणि ख्रिस पॉल पॉल आणि ब्राउन.

सामनाधिकारी: जेफ क्रो, अँडी पायक्रॉफ्ट, रिची रिचर्डसन आणि जवागल श्रीनाथ.