भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर आणि टी-२० संघाचा कर्णधार असलेला रोहित शर्मा सोशल मीडियावर सक्रिय असतो. रोहितचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत मुंबईचे दोन युवा खेळाडू श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर दिसत आहेत. ‘शहरी बाबू’ या गाण्यावर तिघांनी ठेका धरला आहे.

रोहित शर्माने शुक्रवारी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला. व्हिडिओमध्ये तो श्रेयस अय्यर आणि शार्दुलसोबत नागिन डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओला खूप पसंती दिली जात आहे. आतापर्यंत या व्हिडिओला १० लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. इतकेच नाही तर १२ हजारांहून अधिक युजर्सनी यावर कमेंटही केल्या आहेत.

हेही वाचा – PHOTOS : जबराट..! श्रेयस अय्यरच्या बहिणीचीही सोशल मीडियावर हवा; जाणून घ्या तिच्याबद्दल

खरे तर रोहित शर्माने पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावल्याबद्दल श्रेयस अय्यरचे खास अभिनंदन केले आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये रोहितने लिहिले, ”श्रेयस अय्यर, सर्व योग्य स्टेप्ससाठी वेल डन.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत रोहित शर्माने टीम इंडियाची कमान सांभाळली. भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत ३ सामन्यांची मालिका ३-० अशी जिंकली. राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर भारताची ही पहिलीच मालिका होती. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात रोहितला विश्रांती देण्यात आली आहे. तर श्रेयस अय्यरने या सामन्यातून कसोटी पदार्पण केले आणि शानदार शतकही केले.