Rohit Sharma breaks silence on World Cup final Heartbreak : भारताचा कर्णधार रोहित शर्माने विश्वचषक २०२३ मधील अंतिम पराभवानंतर आता एका महिन्याने अखेरीस मौन सोडले आहे. रोहितने मुंबई इंडियन्सशी बोलताना, अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात पराभवामुळे जोडून आलेल्या निराशेतून पुढे जाणे खूप कठीण होते असे म्हटले. तसेच दक्षिण आफ्रिकेतील आगामी कसोटी मालिकेत पुनरागमन करण्याआधी हा अत्यंत कठीण काळ मागे सारून कामावर परत जाण्यासाठी मदत केलेल्या कुटुंब आणि चाहत्यांचे आभार रोहितने मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहित शर्माने सांगितले की, अहमदाबादमध्ये झालेल्या मोठ्या विश्वचषक फायनलच्या रात्रीनंतर मला असहाय्य वाटत होतं. १९ नोव्हेंबर रोजी फायनलमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाकडून एकतर्फी पराभव झाल्यानंतर रोहितला अश्रू आवरण्यासाठी संघर्ष करावा लागला. संघाइतकाच हा पराभव रोहित शर्मासाठी सुद्धा जिव्हारी लागणारा होता, कारण विजयी झाल्यास ५० षटकांचा विश्वचषक जिंकणारा रोहित शर्मा तिसरा भारतीय कर्णधार ठरणार होता.

या पराभवानंतर रोहित व विराट कोहली हे मैदानात हताश दिसले होते, आणि या दोघांपैकी कोणीही मोठ्या पराभवानंतर विश्वचषक फायनलबद्दल बोलले नव्हते. दोघांनीही स्पर्धेनंतर ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. रोहित तर त्याच्या कुटुंबासह परदेशात सुट्टीसाठी गेला होता.

रोहित शर्मा म्हणला की, “मला यातून परत कसं यावं हेच कळत नव्हतं. मला काय करावं हे सुचत नव्हते. माझं कुटुंब आणि मित्रांनी मला मदत केली आणि गोष्टी खूप सहज केल्या. हा पराभव पचायला सोपा नव्हता, परंतु आयुष्य पुढे जात असतं आणि त्यासह तुम्हाला पुढे जायचं असतं. प्रामाणिकपणे, हे कठीण होतं आणि पुढे जाणं इतकं सोपं नव्हतं, मी नेहमीच ५० षटकांचा विश्वचषक पाहत मोठा झालो आहे. आम्ही विश्वचषकासाठी इतकी वर्षं काम केले आहे. पण ठीक आहे, आयुष्यात तुम्हाला हवे ते मिळत नाही कधी तुम्ही निराश व्हाल, कधी खचून जाल.”

मला वाटतं की आम्ही आमच्या बाजूने जे काही करता आलं ते सगळं केलं. जर कोणी विचारलं की आमचं काय चुकलं, तर मी हेच म्हणेन की आम्ही १० खेळ खेळलो, त्यात आमच्याकडून १० चुका झाल्या. पण चुका या प्रत्येक खेळात होतातच, कोणताच खेळ परिपूर्ण कधीच होत नाही फार फार तर तो परफेक्शनच्या जवळ जाऊ शकतो.

Video: रोहित शर्माने पहिल्यांदा सोडलं मौन

दरम्यान, “मी दुसऱ्या बाजूने पाहिले तर मला संघाचा खरोखर अभिमान आहे. आम्ही जसे खेळलो ते सर्व सामने उत्कृष्ट होते. प्रत्येक विश्वचषकात तुम्हाला असे खेळायला मिळत नाही. आम्ही फायनलपर्यंत जसे खेळलो, मला खात्री आहे, आम्ही लोकांना खूप आनंद दिला असणार.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma tells about 10 mistakes in world cup matches says it was heart breaking could not move on final loss watch video svs
First published on: 13-12-2023 at 14:39 IST