Fans got angry with the poster shared by Mumbai Indians : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने शुक्रवारी (१२ जानेवारी) रात्री भारताचा संघ जाहीर केला आहे. हा संघ जाहीर झाल्यानंतर अनेक भारतीय खेळाडूंची निराशा केली आहे, ज्यांना आशा होती की ते भारतीय संघात परततील. दुसरीकडे, भारतीय संघाचा संघ जाहीर झाल्यानंतर मुंबई इंडियन्सने नवा वाद ओढावून घेतला आहे. मुंबईने एक पोस्टर जारी केले आहे, ज्यामधून रोहित शर्मा वगळल्याने चाहते चांगलेच संतापले आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण –

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहित शर्मा कर्णधारपद भूषवणार आहे. रोहितशिवाय विराट कोहलीही या मालिकेत खेळताना दिसणार आहे. भारताचा संघ जाहीर झाल्यानंतर मुंबई इंडियन्सने एक पोस्टर जारी केले आहे. मुंबई इंडियन्स संघाने आपल्या ट्विटर हँडलवर भारतीय संघाचे पोस्टर प्रसिद्ध केले आहे. या पोस्टरमध्ये रोहित शर्माचा फोटो नाही. या पोस्टरवर श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह यांचे फोटो आहेत. रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार आहे, तरीही पोस्टरमध्ये त्याचा फोटो नाही. अशा परिस्थितीत रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सर्व काही ठीक नसल्याच्या बातम्या सोशल मीडियावर येत आहेत.

मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या पोस्टरवर चाहते संतापले –

आयपीएल २०२४ साठी मुंबई इंडियन्स संघाने रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून हार्दिक पांड्याकडे सोपवले आहे. रोहित शर्मा आयपीएलच्या पुढील मोसमात मुंबईकडून खेळताना दिसणार आहे, असे असतानाही या खेळाडूकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले असून ही जबाबदारी हार्दिक पांड्याकडे देण्यात आली आहे. तेव्हापासून सोशल मीडियावर रोहित आणि मुंबई यांच्यात कर्णधारपदावरून हटवल्यानंतर सर्व काही व्यवस्थित नसल्याचाबातम्या येत आहेत. आता पोस्टरमधून रोहित शर्माला वगळून मुंबई इंडियन्सने या अफवेला खतपाणी घातले आहे. मुंबई इंडियन्सच्या या पोस्टवर रोहित शर्माचे चाहते संताप व्यक्त करत आहेत.

हेही वाचा – विजयवीर सिद्धूने पटकावले रौप्य पदक! पॅरिस ऑलिम्पिकसाठी कोटा मिळवणारा ठरला १७वा भारतीय खेळाडू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.