फिफा विश्वचषकातील यजमान ब्राझीलच्या दारुण पराभवानंतर ब्राझीलचे महान फुटबॉलपटू रोमारियो यांनी ब्राझील फुटबॉल महासंघावर टीकास्त्र सोडले आहे. ‘‘ब्राझील महासंघातील सर्व पदाधिकारी भ्रष्ट आहेत. पुढील चार वर्षांसाठी मार्को पोलो डेल नेरो हे अध्यक्षपदाची धुरा हाती घेणार आहेत. पण डेल नेरो हे ब्राझील फुटबॉलमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी सक्षम नाहीत,’’ असे १९९४साली ब्राझीलला विश्वचषक जिंकून देणाऱ्या रोमारियो यांनी सांगितले.