Romario Shepherd traded to Mumbai Indians from Lucknow Super Giants: आयपीएल २०२४ पूर्वी मुंबई इंडियन्स संघात मोठा बदल पाहायला मिळत आहे. मुंबई संघाने लखनऊ सुपर जायंट्सच्या ट्रेडच्या माध्यमातून रोमॅरियो शेफर्डला आपल्या संघात सहभागी करून घेतले आहे. वेस्ट इंडिजचा गोलंदाज अष्टपैलू खेळाडूने आयपीएलमध्ये आतापर्यंत फक्त ४ सामने खेळले आहेत. आयपीएल २०२३ मध्ये, तो लखनऊ सुपर जायंट्ससाठी फक्त १ सामना खेळला, ज्यामध्ये तो फलंदाजी करताना पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता.

यापूर्वी २०२२ मध्ये शेफर्ड सनरायझर्स हैदराबादचा भाग होता. त्याने हैदराबाद संघाकडूनच आयपीएलमध्ये पदार्पण केले. हैदराबाद संघाने २०२२ च्या आयपीएलमध्ये वेस्ट इंडिजच्या अष्टपैलू खेळाडूला ७.७५ कोटी रुपयांना खरेदी केले होते. यानंतर, लखनऊ सुपर जायंट्सने त्याला आयपीएलच्या सोळाव्या हंगामासाठी म्हणजेच २०२३ स्पर्धेसाठी ५० लाख रुपये देऊन आपल्या सहभागी केले होते. शेफर्डने आतापर्यंत एकूण ४ आयपीएल सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने फलंदाजीत ५८ धावा केल्या आहेत आणि गोलंदाजीत ३ विकेट्स घेतल्या आहेत.

आयपीएल २०२४च्या लिलावापूर्वी संघ खेळाडूंना ट्रेड करू शकतात. याशिवाय, संघांना लिलावाच्या सुमारे एक महिना आधी राखून ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागेल. वृत्तानुसार, आयपीएल संघांना १५ नोव्हेंबरपर्यंत आयपीएल समितीला कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी सादर करावी लागेल. २०२४ च्या स्पर्धेचा लिलाव जवळपास एक महिन्यानंतर होणार आहे.

हेही वाचा – NED vs AFG, World Cup 2023: अफगाणिस्तानच्या फिरकीपुढे नेदरलँड्सच्या फलंदाजांची उडाली तारांबळ, विजयासाठी ठेवले १८० धावांचे लक्ष्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अहवालांवर विश्वास ठेवला तर, आयपीएल २०२४ च्या लिलावाची तारीख १९ डिसेंबर ठेवण्यात आली आहे. हा लिलाव भारतात नाही तर दुबईत होऊ शकतो. यापूर्वी २०२३ मध्ये आयपीएलचा लिलाव कोची येथे झाला होता. यावेळी संघांना त्यांच्या आवडत्या खेळाडूंवर खुलेआम बोली लावता येणार आहे. कारण संघांच्या पर्सची किंमत पाच ते पाच कोटी रुपयांनी वाढू शकते. म्हणजे संघांची पर्स व्हॅल्यू जी आधी ९५ कोटी रुपये होती, ती यावेळी १०० कोटी रुपये होईल. अॅलेक्स हेल्स, सॅम बिलिंग्ज, पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड, ख्रिस वोक्स आणि जेराल्ड कोइट्झ सारखे परदेशी खेळाडू देखील आयपीएल २०२४ लिलावात सहभागी होऊ शकतात.