ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि मिरालेम पॅनिक यांनी नोंदवलेल्या गोलच्या बळावर युव्हेंटसने बोलोग्नाचा २-१ असा पराभव करून सीरी ए चषक फुटबॉल स्पर्धेतील गुणतालिकेत अग्रस्थान मिळवले आहे. या आठवडय़ात सप्तशतकी गोलची नोंद करणाऱ्या ३४ वर्षीय रोनाल्डोने १९व्या मिनिटाला ७०१वा गोल साकारला. त्यानंतर दुसऱ्या सत्रात आठव्या मिनिटाला पॅनिकने युव्हेंटसच्या खात्यावर दुसऱ्या गोलची भर घातली. पहिल्या सत्रात बचावपटू डॅनिलो लारांगेरियाने २६व्या मिनिटाला गोल करीत बोलोग्नाला बरोबरी साधून दिली होती.
संग्रहित लेख, दिनांक 21st Oct 2019 रोजी प्रकाशित
रोनाल्डोच्या ७०१व्या गोलमुळे युव्हेंटस विजयासह गटात अव्वल
सप्तशतकी गोलची नोंद करणाऱ्या ३४ वर्षीय रोनाल्डोने १९व्या मिनिटाला ७०१वा गोल साकारला.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 21-10-2019 at 05:50 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ronaldos 701th goal tops the group with the yuventes victory abn