Yuzvendra Chahal Unwanted Record : आयपीएल २०२४ मधील २६वा सामना पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यादरम्यान राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत पंजाब किंग्जला २० षटकांत ८ गडी गमावून १४७ धावा केल्या होत्या, मात्र यादरम्यान आरआरचा स्टार गोलंदाज युजवेंद्र चहलच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला. त्याने एका खास प्रकरणात द्विशतक झळकावले आहे आणि आयपीएलच्या इतिहासात असे करणारा तो दुसरा गोलंदाज आहे.

चहलच्या नावावर नोंदवला नकोसा विक्रम –

युजवेंद्र चहल हा आयपीएल आणि टी-२० क्रिकेटमधील भारताचा महान फिरकी गोलंदाज आहे. आयपीएल २०२४ मध्येही तो जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता, परंतु युजवेंद्र चहल आता आयपीएलच्या इतिहासातील दुसरा गोलंदाज बनला आहे, ज्याच्याविरुद्ध २०० षटकार मारले गेले आहेत. चहलने आयपीएलमधील आपल्या १५१व्या सामन्यात हा नकोसा विक्रम केला. त्याने आयपीएलमध्ये एकूण ३३०५ चेंडू टाकले आहेत. ज्यामध्ये त्याच्याविरुद्ध २०० षटकार मारण्यात आले आहेत. चहलशिवाय पियुष चावलाविरुद्ध २०० हून अधिक षटकार मारले आहेत. त्याच्याविरुद्ध आयपीएलमध्ये एकूण २११ षटकार मारण्यात आले आहेत.

IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Match Updates in Marathi
IPL 2024: जसप्रीत बुमराहने ५ विकेट्स घेत रचला इतिहास, आयपीएलच्या १७ वर्षांत ही कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
IPL 2024 Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Match Updates in Marathi
IPL 2024: जोस बटलरचं तडाखेबंद शतक; राजस्थानने विक्रमी पाठलागाची केली बरोबरी
raj thackeray amit shah (
भाजपाने मनसेला नेमकी काय ऑफर दिलेली? राज ठाकरे म्हणाले, “त्यांनी मला सांगितलं…”

आयपीएलमध्ये या गोलंदाजांविरुद्ध मारलेत सर्वाधिक षटकार –

पियुष चावला – २११ षटकार
युजवेंद्र चहल – २०० षटकार
रवींद्र जडेजा – १९८ षटकार
आर अश्विन – १८९ षटकार
अमित मिश्रा – १८२ षटकार

हेही वाचा – PBKS vs RR : राजस्थानसाठी IPL पदार्पण करणारा कोण आहे तनुष कोटियन? ज्याने १०व्या क्रमांकावर झळकावलंय शतक

युजवेंद्र चहलचा आयपीएलमधील आकडेवारी –

युजवेंद्र चहलचा आयपीएलमधील आकडेवारी खूपच चांगली आहे. या हंगामात त्याने ६ सामन्यात एकूण ११ विकेट घेतल्या आहेत. तो पर्पल कॅपच्या शर्यतीतही आहे. आयपीएलमध्ये चहलने १५१ सामन्यात २१.३१च्या सरासरीने आणि ७.६६ च्या इकॉनॉमीने १९८ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची सर्वोत्तम गोलंदाजी म्हणजे ४० धावांत ५ विकेट्स आहेत. आयपीएलच्या इतिहासात चहलच्या नावावर सर्वाधिक विकेट्स (१९८) आहेत. त्याच वेळी, तो आयपीएलमध्ये २०० विकेट्सच्या अगदी जवळ आहे आणि असे करणारा तो पहिला गोलंदाज देखील बनू शकतो.