jasprit Bumrah: इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली त्यावेळी जसप्रीत बुमराहबाबत मोठी अपडेट देण्यात आली होती. त्याला मालिकेसाठी संघात स्थान दिलं, पण तो ५ पैकी ३ सामने खेळणार असल्याचं आधीच स्पष्ट सांगितलं गेलं होतं. तो पाहिला, तिसरा आणि चौथा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. पण पाचवा सामना निर्णायक सामना निर्णायक असूनही त्याला विश्रांती देण्यात आली. यासह सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याला रिलीज करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान रायन टेन डोशेटने जसप्रीत बुमराहबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

बुमराहला हेडिंग्ले कसोटीसाठी संघात स्थान देण्यात आलं होतं. त्यानंतर एजबस्टन कसोटीत त्याला विश्रांती देण्यात आली. त्यानंतर लॉर्ड्स आणि ओल्ड ट्रॅफर्ड कसोटीसाठी त्याला पुन्हा एकदा संघात स्थान देण्यात आलं. त्यामुळे ठरल्याप्रमाणे त्याचे ३ सामने खेळून झाले होते. दरम्यान पाचव्या सामन्यात जसप्रीत बुमराह खेळणार की नाही, याबाबत कर्णधार शुबमन गिल आणि गौतम गंभीर निर्णय घेणार असल्याचं म्हटलं गेलं होतं.

पाचव्या सामन्यात जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी प्रसिद कृष्णाला संधी देण्यात आली आहे. दरम्यान पाचव्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ झाल्यानंतर रायन टेन डोशेट म्हणाला, “ आम्हाला असं वाटत होतं की त्याने या सामन्यात खेळावं. पण त्याचा वर्कलोड पाहता त्याला संघात स्थान देणं योग्य वाटत नव्हतं. त्याने खूप जास्त गोलंदाजी केली आहे. ”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच तो पुढे म्हणाला, “ पण त्याचा वर्कलोड पाहिला, तर त्याने खूप जास्त गोलंदाजी केली आहे. या दौऱ्यावर येण्याआधीच त्याने सांगितलं होतं की, तो ३ कसोटी सामने खेळणार आहे. त्यामुळे आम्हालाही वाटलं की, त्याच्या निर्णयाचा आदर करायला हवा.” जसप्रीत बुमराह कोणते ३ सामने हे त्यानेच ठरवलं. ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजीसाठी अनुकूल आहे. याचा इंग्लंडच्या गोलंदाजांनी चांगला फायदा घेतला. त्यामुळे जसप्रीत बुमराहसारखा अनुभवी गोलंदाज संघात असता तर भारतीय संघालाही फायदा झाला असता.