scorecardresearch

Premium

SA vs AFG: अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

Cricket World Cup 2023, SA vs AFG Match Updates: पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या तुलनेत अफगाणिस्तानचा नेट रन रेट खूप खराब आहे. त्यामुळे त्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल आणि इतरांच्या निकालावर अवलंबून रहावे लागेल.

SA vs AFG World Cup 2023 Latest Score Updates in Marathi
दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान स्कोअर अपडेट्स (फोटो सौजन्य-एपी/एएनआय)

South Africa vs Afghanistan ICC Cricket World Cup 2023 Match Updates: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा ४२वा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान आमनेसामने आहेत. दोन्ही संघाचा हा शेवटचा साखळी सामना आहे. या सामन्यात अफगाणिस्तान संघाला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी मोठ्या फरकाने विजय आवश्यक आहे. मात्र, भारत आणि ऑस्ट्रेलियासह दक्षिण आफ्रिकेने विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली आहे. आता अफगाणिस्तानला स्पर्धेत टिकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला कोणत्याही परिस्थितीत पराभूत करावे लागेल. तत्पूर्वी अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या तुलनेत अफगाणिस्तानचा नेट रन रेट खूप खराब आहे. त्यामुळे त्यांना मोठ्या फरकाने विजय मिळावा आणि इतर सामन्यांचे निकाल अनुकूल असतील अशी आशा बाळगावी लागेल. या सामन्याचा निकाल काहीही लागला तरी अफगाणिस्तानने आपल्या शानदार कामगिरीने सर्वांची मने जिंकली आहेत. अफगाणिस्तानने आठपैकी चार सामने जिंकले आहेत. आता ते आत्मविश्वासाने भरले आहेत आणि जेव्हा त्यांचा दिवस असेल तेव्हा ते कोणालाही पराभूत करू शकतात.

ICC action on Wanindu Hasranga
SL vs AFG 3rd T20 : पंचांशी वाद घालणं पडलं महागात; श्रीलंकेच्या कर्णधारावर आयसीसीची मोठी कारवाई
Mohammad Amir Praises Virat Video Viral
VIDEO : विराटच्या नेतृत्वाखाली खेळायला आवडेल की बाबरच्या? पाकिस्तानच्या गोलंदाजाने दिले चकीत करणारे उत्तर
Umpire stops Australia Wicket celebrations no appeal For run out Rule For Not Out AUS vs WI T20I Highlights Second Win After IND vs AUS
ऑस्ट्रेलियाचं सेलिब्रेशन पंचांनी थांबवलं; बाद असूनही ‘त्याला’ घोषित केलं नाबाद, क्रिकेटचा हा नियम काय सांगतो?
Nasir Hussain believes Kohli unavailability is a loss for world cricket including India sport news
कोहलीच्या अनुपलब्धतेमुळे भारतासह जागतिक क्रिकेटचे नुकसान! इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसेन यांचे मत

अफगाणिस्तानचा संघ उपांत्य फेरीसाठी कसा पात्र ठरेल?

अफगाणिस्तानचा सध्याचा नेट रन रेट -०.३३८ आहे, तर न्यूझीलंडने +०.७४३ च्या नेट रन रेटने साखळी फेरी पूर्ण केली. वानखेडे स्टेडियमवर भारताविरुद्धचा उपांत्य सामना खेळण्यासाठी आणि नेट रनरेटच्या बाबतीत न्यूझीलंडला मागे टाकण्यासाठी अफगाणिस्तानला दक्षिण आफ्रिकेला ४३८ धावांनी पराभूत करावे लागेल. त्याचबरोबर पाकिस्तान इंग्लंडविरुद्धचा सामना पराभूत व्हावा, अशी प्रार्थना करावी लागेल.

हेही वाचा – World Cup 2023: उपांत्य फेरीसाठी न्यूझीलंड मजबूत स्थितीत, पाकिस्तान संघासाठी काय आहे समीकरण? जाणून घ्या

अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, राशिद खान, इकराम अलीखिल (यष्टीरक्षक), मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन उल हक

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (डब्ल्यू), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, अँडिले फेहलुकवायो, डेव्हिड मिलर, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sa vs afg match updates afghanistan have won the toss and elected to bat first against south africa vbm

First published on: 10-11-2023 at 13:39 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×