जगातील महान फलंदाज सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या फोटो आणि व्हिडिओंवर चाहते अनेकदा प्रतिक्रिया देतात. अलीकडेच सारा तेंडुलकरने एका खास डेट नाईटचा फोटो शेअर केला आहे. याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. साराने तिच्या इन्स्टाग्रामवर डेट नाईटचा फोटो शेअर केला आहे.

इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत साराने लिहिले, ‘स्पेशल डेट नाईट.’ यामध्ये तिने बॉलिवूड गायिका कनिका कपूरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती त्याचा हात धरलेली दिसत आहे. कनिका कपूरनेही तिच्या अकाऊंटवरून असाच एक फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे सारा आणि कनिका चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यांची मैत्री अनेकदा सोशल मीडियावर पाहायला मिळते. याआधीही दोघे लंडनमध्ये अनेकदा एकत्र दिसले आहेत.

सारा तेंडुलकर

हेही वाचा – IND vs NZ : दांड्या उडाल्या अन्…! अश्विननं पुन्हा सोशल मीडियावर उठवलं रान; VIDEO पाहून व्हाल हैराण!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साराने काही दिवसांपूर्वी तिचा भाऊ अर्जुन तेंडुलकरसोबतचा एक फोटो शेअर केला होता. तत्पूर्वी, तिने लंडनमध्ये मित्रांसोबत २४वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाचे फोटोही तिने शेअर केले आहेत. सारा तेंडुलकरचे नाव भारतीय क्रिकेटपटू शुबमन गिलसोबत जोडले गेले आहे. सारा आणि शुबमन अनेकदा इव्हेंट्स आणि पार्ट्यांमध्ये एकत्र दिसतात. या दोघांनीही त्यांच्या नात्याची अधिकृत पुष्टी केलेली नाही.