scorecardresearch

Sachin Tendulkar: …म्हणून सचिन तेंडुलकरला ‘क्रिकेटचा देव’ म्हणतात; IPL च्या ‘त्या’ सामन्यात नेमकं काय घडलं होतं?

‘God Of Cricket’ Sachin Ramesh Tendulkar : आयपीएलच्या त्या सामन्यात सचिन तेंडुलकरने इतिहास रचला होता.

Sachin Tendulkar Records In Cricket
…म्हणून सचिनला क्रिकेटचा देव म्हणतात. (Image-Indian Express)

‘God Of Cricket’ Sachin Ramesh Tendulkar : वयाच्या १६ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून भल्या भल्या गोलंदाजांचा धुव्वा उडवणारा सचिन बघता बघता क्रिकेटचा देवच झाला. मैदानात उतरल्यानंतर गोलंदाजांवर सचिनने चौफेर फटकेबाजी केली नाही, असे सामने हातावर बोटे मोजण्या इतके असतील. सचिनने अप्रतिम फलंदाजी करत क्रिकेटमध्ये अनेक विक्रमांना गवसणी घातलीय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतक ठोकणाऱ्या सचिनचा विक्रम आजतागायत कोणत्याही खेळाडूने मोडला नाही. म्हणून आजही क्रिकेटच्या मैदानात सचिन…सचिनचा नारा लगावला जातो.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच नाही तर आयपीएलमध्येही सचिन तेंडुलकरने धडाकेबाज फलंदाजीची छाप टाकली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या तिसऱ्या सीजनमध्ये सचिनने ऑरेंज कॅप जिंकून सिद्ध करून दाखवलं होतं की, त्याला क्रिकेटचा देव का म्हणतात. सचिन सलग ६ वर्षे मुंबई इंडियन्ससाठी खेळला. आयपीएलच्या पहिल्या दोन सीजनमध्ये सचिनने चमकदार कामगिरी केली नव्हती. त्यावेळी सचिनच्या टी-२० क्रिकेटच्या कारकीर्दीबाबत अनेक तर्क वितर्क लढवले गेले. त्यानंतर २०१० मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने अप्रतिम फलंदाजी करून सर्वांच्या भुवया उंचावल्या. सचिनने या आयपीएलमध्ये १५ सामन्यात ४७.५३ च्या सरासरीनं ६१८ धावा केल्या. त्यामुळे सचिनला आयपीएलच्या ऑरेंज कॅपने सन्मानित करण्यात आलं.

नक्की वाचा – Video: WPL मध्ये इस्सी वोंगने रचला इतिहास; फलंदाजांच्या केल्या दांड्या गुल, पाहा विकेट हॅट्रिकचा व्हिडीओ

याचसोबत सचिनने २०१० च्या आयपीएल दरम्यान ५ वेळा पन्नासहून अधिक धावा कुटल्या. सचिनच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पहिल्यांदाच आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता.चेन्नई सुपर किंग्जच्या विरोधात झालेल्या सामन्यात हाताला दुखापत झाली असतानाही सचिनने ४८ धावांची खेळी केली होती. पण त्या सामन्यात मुंबई इंडियन्सला विजय मिळवता आला नाही. तसंच सचिनने आयपीएलच्या चौथ्या सीजनमध्येही कमाल केली होती. आयपीएलच्या त्या सीजनमध्ये सचिनने ५५३ धावांचा डोंगर रचला होता.सचिनने ७८ सामन्यांत ३४. ८३ च्या सरासरीनं २३३४ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये सचिनने १ शतक आणि १३ अर्धशतक ठोकले होते. सचिनचा आयपीएलमधील सर्वाधिक स्कोर नाबाद १०० आहे. २०१३ नंतर सचिन आयपीएलमधून निवृत्त झाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 10:36 IST

संबंधित बातम्या