Sachin Tendulkar took Aamir Hussain loan : भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आपल्या चाहत्याला दिलेले वचन पूर्ण केले आहे. सचिनने जम्मू आणि काश्मीर पॅरा क्रिकेट संघाचा कर्णधार आमिर हुसेन लोनची भेट घेतली आहे. काही दिवसापूर्वी सचिनने आमिर हुसेन लोनचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यावेळी सचिनने आमिरला शब्द दिला होता, जेव्हा तो जम्मू-काश्मीरला येईल, तेव्हा त्याची भेट घेईल. आता सचिनने भेट घेतल्यानंतरचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सचिन सध्या काश्मीरच्या दौऱ्यावर आहे. प्रसिद्ध भारतीय फलंदाजाने शेवटी आमिर लोनची भेट घेतली, ज्याने यापूर्वी काश्मीरमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या व्हिडिओने सचिनचे लक्ष वेधून घेतले होते. दोघांमध्ये क्रिकेटबद्दल चर्चा झाली. काश्मीरचा हा फलंदाज आपल्या आदर्शाला भेटण्याचा उत्साह आणि आनंद लपवू शकला नाही. तेंडुलकरने आमिरचे कौतुक करत त्याला या पिढीतील मुलांसाठी मोठी प्रेरणा असल्याचे म्हटले.

सचिनने आमिरचे इच्छाशक्ती, जिद्द आणि खेळाबद्दलची आवड याचे कौतुक केले. या माजी भारतीय फलंदाजाने सांगितले की, आमिर त्याच्या मेहनतीमुळे जिथे आहे तिथे पोहोचला आहे. तेंडुलकरने आमिरला एक बॅट भेट दिली ज्यावर लिहिले होते, ‘आमिर हा खरा हिरो आहे. देशाला अशीच प्रेरणा देत राहा. तुला भेटून आनंद झाला.’

हेही वाचा – IND vs ENG 4th Test : रांची कसोटीत यशस्वी जैस्वालचा खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित-सेहवागला टाकले मागे

आमिर हा जम्मू काश्मीर पॅरा क्रिकेट संघाचा कर्णधार –

३४ वर्षीय आमिर जम्मू-काश्मीरच्या पॅरा क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. हा क्रिकेटर वयाच्या आठव्या वर्षी अपघाताचा बळी ठरला. त्याची खेळण्याची खास शैली आहे आणि तो सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आमिर २०१३ पासून व्यावसायिक क्रिकेट खेळत आहे. एका शिक्षकाने त्याची क्रिकेटबद्दलची आवड आणि प्रतिभा त्याला पॅरा क्रिकेटर म्हणून ओळख निर्माण करण्यास मदत केली. आमिर आठ वर्षांचा असताना वडिलांच्या कारखाण्यात झालेल्या अपघातात त्याचे दोन्ही हात गमावले.

हेही वाचा – खांदा आणि गळ्याच्या सहाय्याने फलंदाजी, पायाने गोलंदाजी; काश्मीरच्या आमिर हुसैनची प्रेरणादायी गोष्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमिरचा व्हिडिओ पाहून सचिनही झाला होता चकीत –

गेल्या महिन्यात आमिरच्या फलंदाजीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर सचिन आश्चर्यचकित झाला होता. भविष्यात हुसेन लोनची नक्कीच भेट घेईल,असा शब्द त्यानी दिला होता आणि लाखो लोकांना प्रेरणा दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले होते. तो म्हणाला होता, ‘आमिरने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. मी हे पाहून खूप प्रभावित झालो आहे! यावरून त्याचे खेळावर किती प्रेम आणि समर्पण आहे हे दिसून येते. आशा आहे की एक दिवस मी त्याला भेटेन आणि त्याच्या नावाची जर्सी घेईन. आमिरने खेळाची आवड असलेल्या लाखो लोकांना प्रेरणा देण्यासाठी चांगले काम केले आहे.’