Sachin Tendulkar Son Arjun Tendulkar Engagement: भारताचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर याचा लेक अर्जुन तेंडुलकर याचा साखरपुडा झाल्याची बातमी सध्या समोर आली आहे. अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा हा मुंबईतील प्रतिष्ठित उद्योजक रवी घई यांच्या नातीशी अर्जुनचा साखरपुडा झाल्याचा रिपोर्ट समोर आला आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा रवी घई यांची नात सानिया चंडोकशी झाला आहे. अर्जुन आणि सानियाचा साखरपुडा एका खाजगी समारंभात पार पडला. दोन्ही कुटुंबांतील मोजके सदस्य आणि मित्र या लग्नाला उपस्थित होते.

घई कुटुंब हे मुंबईतील एक मोठे आणि प्रसिद्ध व्यावसायिक कुटुंब आहे. तो इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राइव्ह हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरी (कमी कॅलरी असलेला आईस्क्रीम ब्रँड) चे मालक आहे.

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२५ मध्ये अर्जुन तेंडुलकरची कामगिरी पाहायला मिळाली नाही. कारण त्याला संपूर्ण स्पर्धेत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. मुंबई इंडियन्स (एमआय) ने महालिलावात त्याला ३० लाख रुपयांच्या मूळ किमतीसह संघात कायम ठेवले. पण संघ व्यवस्थापनाने त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करत खेळण्याची संधी दिली नाही. अर्जुन संपूर्ण हंगाम बेंचवर बसलेला दिसला.

Arjun Tendulkar Engagement Viral photo
अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा झाल्याची चर्चा

अर्जुन तेंडुलकरने आतापर्यंत १७ प्रथम श्रेणी, १८ लिस्ट-ए आणि २४ टी-२० सामने खेळले आहेत. प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये अर्जुनने ३३.५१ च्या सरासरीने ३७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने २३.१३ च्या सरासरीने ५३२ धावा केल्या. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये अर्जुनच्या नावावर २५ विकेट्स (सरासरी ३१.२) आणि १०२ धावा (सरासरी १७) आहेत.

अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांच्या साखरपुड्याबाबत अद्याप तेंडुलकर किंवा घई कुटुंबाने त्यांच्या साखरपुड्याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.