भारताची फुलराणी सायना नेहवालने जागतिक क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थानी झेप घेतली आहे. गेल्या महिन्यात इंडिया ओपन स्पर्धेच्या जेतेपदासह सायनाने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी कब्जा केला होता. हे स्थान पटकावणारी सायना पहिली महिला भारतीय खेळाडू ठरली होती.
दरम्यान, कामगिरीत घसरण तसेच एका स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे सायनाची एका स्थानाने घसरण होऊन ती दुसऱ्या स्थानावर स्थिरावली होती. मात्र काही दिवसांतच सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर सायनाने अव्वल स्थान पटकावले आहे.
पी. व्ही. सिंधूची एका स्थानाने घसरण होऊन ती १२व्या स्थानी आहे. पुरुषांमध्ये किदम्बी श्रीकांतने चौथे स्थान कायम राखले आहे. पारुपल्ली कश्यप १३व्या आणि इंडोनेशिया स्पर्धेचा विजेता एच. एस. प्रणॉय १५व्या स्थानी स्थिर आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd May 2015 रोजी प्रकाशित
सायना पुन्हा क्रमवारीत अव्वलस्थानी
भारताची फुलराणी सायना नेहवालने जागतिक क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थानी झेप घेतली आहे. गेल्या महिन्यात इंडिया ओपन स्पर्धेच्या जेतेपदासह सायनाने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी कब्जा केला होता.

First published on: 22-05-2015 at 03:55 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saina nehwal regains top spot in world badminton rankings