Wrestler Protest: कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या आरोपांनंतर सरकारने कुस्ती महासंघाच्या (WFI) कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी एक निरीक्षण समिती स्थापन केली होती. सोमवारी (23 जानेवारी) या समितीच्या सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली, मात्र समिती स्थापन होऊनही हा दंगा थांबलेला नाही. समितीच्या सदस्यांच्या नावावर कुस्तीपटूं नाराजी व्यक्त केली आहे.

ऑलिम्पियन कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक यांनी मंगळवारी (२४ जानेवारी) ट्विट केले की, समितीच्या स्थापनेबाबत सरकारने कुस्तीपटूंशी चर्चा केली नाही. क्रीडा मंत्रालयाने म्हटले होते की, कुस्तीपटूंकडून सल्ला घेण्यात आला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रीडा मंत्रालयाने सांगितले की, निरीक्षण समितीतील ५ पैकी ३ नावे या (आंदोलक) कुस्तीपटूंनी सुचवली होती, पण आता त्यांचा असा दावा आहे की त्यांचा सल्ला घेण्यात आला नाही.

तत्पूर्वी, टोकियो ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया यांनी ट्विट केले होते की, “निरीक्षण समितीच्या स्थापनेपूर्वी आमच्याशी सल्लामसलत केली जाईल, असे आश्वासन आम्हाला देण्यात आले होते. या समितीच्या स्थापनेपूर्वी आमच्याशी सल्लामसलतही करण्यात आली नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे.”

हेही वाचा – अन्वयार्थ : शोषक मानसिकतेची लक्तरे

आमच्याशी सल्लामसलतही केली नाही –

ऑलिम्पियन कुस्तीपटू साक्षी मलिकने ट्विट केले की, “निरीक्षण समितीच्या स्थापनेपूर्वी आमच्याशी सल्लामसलत केली जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. या समितीच्या स्थापनेपूर्वी आमच्याशी सल्लामसलतही करण्यात आली नाही. हे अतिशय दुःखद आहे.” साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी पीएम मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनाही टॅग केले आहे.

हेही वाचा – IND vs NZ 3rd ODI: रोहित शर्माच्या शतकानंतर सूर्यकुमार यादवची भन्नाट रिअ‍ॅक्शन; पाहा VIDEO

मेरी कोमच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन –

भारतीय कुस्ती महासंघ (WFI) चे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पाच सदस्यीय देखरेख समितीच्या अध्यक्षपदी अनुभवी बॉक्सर एमसी मेरी कोमला नियुक्त करण्यात आली होती.

हेही वाचा – विश्लेषण: जंतरमंतर का बनले कुस्तीगिरांचा आखाडा? कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांवर आरोप नेमके काय?

समितीचे इतर सदस्य –

ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त, माजी बॅडमिंटनपटू तृप्ती मुरगुंडे, माजी टॉप्सचे सीईओ राजगोपालन आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (SAI) माजी कार्यकारी संचालक (संघ) राधिका श्रीमन या समितीचे इतर सदस्य आहेत. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी या पॅनलच्या स्थापनेची घोषणा केली होती.

हेही वाचा – IND vs NZ 3rd ODI: विराट-इशान एकाच दिशेने धावल्याने गोंधळ; मग किशनने केले असे काही की, VIDEO होतोय व्हायरल

कुस्तीपटूंचे आंदोलन –

कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर देशातील आघाडीच्या कुस्तीपटूंनी लैंगिक छळ आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. दिल्लीतील जंतरमंतरवर कुस्तीपटूंनी आंदोलन केले. तीन दिवसांच्या धरणे आंदोलनानंतर अनुराग ठाकूर यांनी शनिवारी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. याआधी शुक्रवारी रात्री उशिरा अनुराग ठाकूर यांची भेट घेतल्यानंतर कुस्तीपटूंनी आंदोनन मागे घेतले.

Story img Loader