दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल सॅम करनला फटकारण्यात आले आहे. आयसीसीच्या आचारसंहितेच्या लेव्हल १ चे उल्लंघन केल्याबद्दल सॅम करनला त्याच्या मॅच फीच्या १५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. टेंबा बावुमा बाद झाल्यानंतर आनंद साजरा करताना करणचा संयम सुटला. त्यामुळे आयसीसीने त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.

स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.५चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळला आहे. जे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ विरुद्धच्या सामन्यादरम्यान अपमानास्पद भाषा किंवा आक्षेपार्ह हावभाव करण्याशी संबंधित आहे. ज्यामुळे बाद झालेल्या फलंदाजाकडून आक्रमक प्रतिक्रिया निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याला डिमेरिट पॉईंट मिळाला आहे. तसेच २४ महिन्यांच्या कालावधीतील त्याचा हा पहिला आहे. त्याचबरोबर त्याच्या मॅच फीच्या १५ टक्के दंड आकारला आहे.

Ashutosh Sharma's Reaction After Defeat
‘त्या प्रशिक्षकांना मी आवडत नसे, ते मला संघात घेत नसत. यामुळे मी नैराश्यात गेलो’, आशुतोष शर्माचा संघर्ष
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: षटकारांच्या हॅटट्रिकनंतर धोनीने पुन्हा जिंकली मनं, हार्दिकची धुलाई केलेला चेंडू चाहतीला दिला भेट
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर सॅम करनने केली रिव्ह्यूची मागणी, करनच्या चतुराईमुळे असा बाद झाला राहुल त्रिपाठी; पाहा VIDEO
Who is Angkrish Raghuvanshi
IPL 2024 : कोण आहे अंगक्रिश रघुवंशी? ज्याने सुनील नरेनच्या साथीने दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची केली धुलाई

दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील ब्लूमफॉन्टेन येथे रविवारी (२९ जानेवारी) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या डावाच्या २८व्या षटकात ही घटना घडली. आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा बाद झाल्याचा आनंद साजरा करताना करणचा संयम सुटला आणि तो फलंदाजाच्या अगदी जवळ आला. सॅम करनने आपली चूक मान्य केली आणि सामनाधिकारी जेफ क्रो यांनी प्रस्तावित केलेला दंड मान्य केला. त्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज नव्हती.

हेही वाचा – IND vs AUS: भारतीय संघाला मोठा धक्का; ‘हा’ खेळाडू दुखापतीमुळे बाहेर, सूर्यकुमार यादवला मिळू शकते संधी!

आयपीएलच्या मिनी लिलावात इंग्लंडच्या सॅम करनने सर्व विक्रम मोडले. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. आयपीएल २०२३ मिनी-लिलावात २ कोटी रुपयांच्या मूळ किंमतीच्या सॅम करणला पंजाब किंग्जने १८.५० कोटी रुपयांना विकत घेतले.