scorecardresearch

IND vs AUS: भारतीय संघाला मोठा धक्का; ‘हा’ खेळाडू दुखापतीमुळे बाहेर, सूर्यकुमार यादवला मिळू शकते संधी!

IND vs AUS Test Series: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील पहिला कसोटी सामना ९ फेब्रुवारीपासून नागपुरात खेळवला जाणार आहे. सूर्यकुमार यादवचे नागपुरात पदार्पण जवळपास निश्चित दिसत आहे. कारण श्रेयस अय्यर दुखापतीमुळे पहिल्या सामन्याला मुकला आहे.

India Vs Australia Test Series
सूर्यकुमार यादव(फोटो-संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांची बॉर्डर गावसकर कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेला ९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा खेळाडू श्रेयस अय्यर पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे, तर दुसऱ्या कसोटी सामन्यातही त्याच्या खेळण्यावर शंका आहे. त्यामुळे त्याच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये सूर्यकुमारला संधी मिळू शकते.

ही मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण जर संघाने ती जिंकली, तर तो जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी जाहीर केलेल्या भारतीय संघात अय्यर आणि जडेजाचा समावेश आहे. जडेजाने कसोटी मालिकेसाठी फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली आहे, तर अय्यरची अद्याप फिटनेस चाचणी झालेली नाही. पहिल्या कसोटीसाठी अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त होणार नसल्याचे मानले जात आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सूर्यकुमारचा त्याच्या जागी समावेश केला जाऊ शकतो.

पाठीच्या दुखापतीशी झुंजणारा श्रेयस अय्यर दुसऱ्या कसोटीपूर्वी तंदुरुस्त होण्याची अपेक्षा आहे. श्रेयसचे सध्या बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये रिकव्हरी सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनेक इंजेक्शन्स घेतल्यानंतरही अय्यरला पाठीच्या खालच्या भागात दुखत आहे. अशा परिस्थितीत त्याला किमान दोन आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

हेही वाचा – भारत-न्यूझीलंड  ट्वेन्टी-२० मालिका : भारताचे मालिका विजयाचे लक्ष्य; न्यूझीलंडविरुद्ध तिसरा ट्वेन्टी-२० सामना आज; गिल, किशनकडे नजरा

एका बीसीसीआयच्या सूत्राने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, ”त्याची दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झाली नसल्याने तो पहिला कसोटी सामना खेळू शकणार नाही. त्याचवेळी दुसऱ्या कसोटीतही त्याच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. श्रेयस बाहेर पडल्यानंतर सूर्यकुमार यादवचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण करू शकतो.

ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.

हेही वाचा – Shahid Afridi: पाकिस्तान बोर्डाचा अजब कारभार! प्रशिक्षकाच्या निर्णयावर शाहीद आफ्रिदी संतापला म्हणाला, “आता काय ऑनलाईन क्रिकेट…”

भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ –

पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, जोश हेझलवूड, उस्मान ख्वाजा, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, टॉड मर्फी, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, लान्स मॉरिस, अॅश्टन अगर , मिचेल स्वीपसन, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड, स्कॉट बोलँड.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 12:38 IST