Tennis Star Sania Mirza Divorce : भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांचा घटस्फोट झाल्याचा दावा त्यांच्या जवळच्या व्यक्तीने केला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या दोघांमध्ये काही तरी बिनसलं असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ते दोघेही लवकरच घटस्फोट घेणार असल्याचेही बोललं जात होतं. अखेर या चर्चांवर त्यांच्या जवळील व्यक्तीने शिक्कामोर्तब केलं आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक याच्या जवळच्या एका व्यक्तीने सानिया आणि शोएब यांच्या नात्यावरील चर्चांवर शिक्कामोर्तब केले आहे. तसेच ते वेगळे राहत असल्याचेही सांगितले आहे.

अनेक वृत्तवाहिनींनी दिलेल्या वृत्तानुसार, सानिया मिर्झा आणि शोएब मलिक हे गेल्या अनेक दिवसांपासून वेगळे राहत आहेत. त्या दोघांनी आता औपचारिकरित्या घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया सुरु केली आहे. शोएब मलिकच्या पाकिस्तानातील व्यवस्थापन संघाचा सदस्य असलेल्या व्यक्तीने हा खुलासा केला आहे.
आणखी वाचा : प्रेम, लग्न, घटस्फोट; ‘बिग बॉस’मुळे चर्चेत असलेल्या अपूर्वा नेमळेकरच्या खासगी आयुष्याबद्दल माहितीये का?

सानिया आणि शोएबच्या लग्नाला काही महिन्यांपूर्वी १२ वर्ष पूर्ण झाली होती. काही दिवसांपूर्वी शोएब आणि सानिया यांनी एकत्रितपणे त्यांच्या मुलाचा वाढदिवस साजरा केला होता. शोएबने याचे अनेक फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र सानियाने यासंबंधी कोणतीही पोस्ट केली नाही.

त्यानंतर तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यानंतर ते दोघेही घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचेही स्पष्ट पाहायला मिळत होते. पण त्या दोघांनीही याबद्दल काहीही भाष्य केलेले नव्हते. त्यानंतर आता शोएब आणि सानियाच्या वैवाहिक आयुष्यात काहीही सुरळीत नसल्याचा अंदाज खरा ठरल्याचे बोललं जात आहे.

आणखी वाचा : सानिया मिर्झा-शोएब मलिक १२ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेणार? चर्चांदरम्यान लग्नाचे फोटो व्हायरल

सानिया आणि शोएबच्या जवळच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, त्या दोघांनी घटस्फोटासाठीची प्रक्रिया सुरु केली आहे. सध्या ते दोघेही वेगवेगळे राहत आहेत. सानिया सध्या दुबईमध्ये राहत आहे. तर शोएब मलिक पाकिस्तानात वास्तव्यास आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सानिया आणि शोएब यांचा प्रेमविवाह झाला होता. काही महिन्यांच्या रिलेशनशिपनंतर दोघेही १२ एप्रिल २०१० रोजी लग्नबंधनात अडकले होते. यावेळी ते दोघेही पारंपारिक वेषात दिसले होते. त्या दोघांनी हैदराबादमध्ये लग्न केलं होतं. नंतर पाकिस्तानमध्ये रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. सानिया मिर्झा हिने २०१८ मध्ये मुलाला जन्म दिला होता. त्याचे नाव इझान असे आहे. सध्या सानिया ही ३५ वर्षांची असून शोएब मलिक हा ४० वर्षांचा आहे. या घटस्फोटाबद्दल शोएब किंवा सानियाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.