भारताची सानिया मिर्झा आणि झिम्बाब्वेची कारा ब्लॅक यांनी हंगामातील अखेरच्या प्रतिष्ठित डब्लूटीएच्या अंतिम फेरीत महिला दुहेरीचे विश्वविजेतेपदक पटकावले आहे. सानिया मिर्झा आणि कॅरा ब्लॅकला या जोडीने तैपेईच्या सू वेई आणि चीनच्या शूई पेंग यांचा ६-१. ६-० असा पराभव केला.
सिंगापूरमध्ये सुरु असलेल्या महिला टेनिस असोसिएशनच्या (डब्ल्यूटीए) विश्व चॅम्पियनशिपमधील महिला दुहेरीत रविवारी सानिया मिर्झा – कॅरा ब्लॅक व सू वेई सेई – शूई पेंग या जोडीत अंतिम सामना रंगला. जगातील अव्वल आठ डब्लूटीए जागतिक रॅँकिंगमधील जोडयांना या हंगामातील शेवटच्या स्पर्धेत खेळण्याचा मान मिळतो. सानिया – कॅरा या जोडीचे महिला दुहेरीतील हे पाचवे विजेतेपद आहे. सानिया – कॅरा या जोडीचा हा शेवटचा सामना होता. यानंतर सानिया व कॅरा एकत्र खेळणार नाही. सानियाने पुढीलवर्षीपासून तैपेईच्या सू वेई सेईसोबत खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Oct 2014 रोजी प्रकाशित
महिला दुहेरीत सानिया मिर्झा आणि कॅरा ब्लॅकला विजेतेपद
भारताची सानिया मिर्झा आणि झिम्बाब्वेची कारा ब्लॅक यांनी हंगामातील अखेरच्या प्रतिष्ठित डब्लूटीएच्या अंतिम फेरीत महिला दुहेरीचे विश्वविजेतेपदक पटकावले आहे.
First published on: 26-10-2014 at 04:18 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sania mirza cara black clinches wta finals title