Sara Tendulkar Arjun Tendulkar Rakshabandhan Celebration Video: आज बहिण-भावाच्या नात्याचा खास दिवस म्हणजेच रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे. एकमेकांच्या खोड्या काढणं आणि भांडणं करणं हा बहिण भावाच्या या नात्याचा अविभाज्य घटक आहे. आजच्या रक्षाबंधनाच्या दिवशी अर्जुन आणि साराने देखील असाच एक व्हीडिओ शेअर करत खास अंदाजात सेलिब्रेशन केलं आहे.
सारा तेंडुलकरने रक्षाबंधनाच्या दिवशी एक रील शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने सुरूवातीला अर्जुनबरोबरचे लहानपणीचे फोटो टाकले आहेत. त्यानंतर अर्जुन तिचा मेकअप करताना पूर्ण व्हीडिओ आहे. या दोघांनीही खास अंदाजात रक्षाबंधन साजरा केलं आहे.
सारा तेंडुलकर-अर्जुन तेंडुलकरचं अनोखं रक्षाबंधन सेलिब्रेशन
अर्जुन तेंडुलकर एकदम टिपिकल भाऊ असल्यासारखं चिडचिड करत वागताना दिसत आहे. याशिवाय अर्जुनला इतर भावांप्रमाणेच मेकअपमधील अर्ध्या अधिक गोष्टी माहित नसल्याचही स्पष्ट कळत आहे. व्हिडिओमध्ये, साराने अर्जुनकडून तिचा मेकअप करून घेतला. मेकअप ब्रश आणि लिपस्टिकपासून ते आयलाइनरपर्यंत, अर्जुनने साराचा मेकअप केला. साराने मेकअप करून घेत असताना अर्जुनला टिप्सदेखील देत होती.
मेकअपच्या दरम्यान त्या दोघांमधील खोडकरपणा आणि मस्ती प्रत्येकालाच आपल्या भावंडांची आठवण करून देणारी आहे. साराने शेअर केलेला हा व्हीडिओ काहीच वेळात व्हायरल झाला आहे. साराने भाऊ अर्जुनबरोबर अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरं केलं आहे. सारा ही अर्जुनपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे.
अर्जुनने स्वत: केलेल्या मेकअपला १० पैकी १ गुण दिला. तर साराने इतकाही खराब मेकअप केला नसल्याचं म्हटलं आहे. अखेरीस सारा म्हणाली, मला तर वाटलं यापेक्षा वाईट मेकअप करशील असं वाटलं होतं. साराने शेअर केलेला व्हीडिओ एक मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.
सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या पोस्ट अनेकदा चर्चेचा विषय बनतात. फॅशन असो, प्रवास असो किंवा कुटुंबाबरोबर घालवलेले क्षण असो, साराची प्रत्येक पोस्ट चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.