बोगोटा, कोलंबिया येथे सुरू असलेल्या पीएसए स्पर्धेत सौरव घोषालने अंतिम फेरीत धडक मारली. कारकीर्दीतील संस्मरणीय विजयाची नोंद करताना सौरवने अव्वल मानांकित आणि कोलंबियाच्या मिग्युेलन रॉड्रिगेझवर ११-८, १२-१०, ७-११, ४-११, १२-१० असा विजय मिळवला. वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी राष्ट्रीय विजेता सौरव आठवडाभरापूर्वीच कोलंबियात दाखल झाला होता. अंतिम फेरीत त्याची लढत पात्रता फेरीतून आलेल्या आल्फ्रेडो अव्हिलाशी होणार आहे.