पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने टी-२० विश्वचषक २०२१ मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. वर्ल्डकप स्पर्धा काही दिवसातच सुरू होणार असून २४ ऑक्टोबरला क्रिकेटरसिकांना भारत-पाक सामन्याचा आनंद घेता येणार आहे. हे दोन्ही संघ फक्त आयसीसीच्या स्पर्धेत आमनेसामने येतात. विशेष म्हणजे, वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानला एकदाही भारताला हरवता आलेले नाही.

आफ्रिदी म्हणाला, ”भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना खूप मोठा आहे आणि यामुळे दोन्ही संघांच्या खेळाडूंवर खूप दबाव आहे. जो संघ हा दबाव चांगल्या प्रकारे हाताळू शकतो, त्याची जिंकण्याची अधिक शक्यता असते. या व्यतिरिक्त, जो संघ कमी चुका करेल, त्याची जिंकण्याची शक्यता अधिक असेल.”

हेही वाचा – “हे १४ सामने…”; प्लेऑफमधून बाहेर पडल्यानंतर कर्णधार रोहित शर्माचा मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसाठी खास संदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याआधी पाकिस्तानचा माजी गोलंदाज आकिब जावेद यांनी पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघ ताकदवान असल्याचे मत दिले होते. त्यांच्या मते, भारतीय संघ जरी सामान्य खेळ खेळला, तरी तो पाकिस्तानला हरवेल. दुसरीकडे, जर पाकिस्तानला जिंकायचे असेल, तर त्यांना त्यांचे सर्वोत्तम क्रिकेट खेळावे लागेल.

एकदिवसीय विश्वचषकात, भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध सात वेळा विजय मिळवला आहे आणि टी-२० विश्वचषकात भारतीय संघाने पाकिस्तानला पाच वेळा पराभूत केले आहे. २००७ मध्ये भारताने पहिल्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद पटकावले.