Shakib Al Hasan Blurred In World Cup 2023: भारतात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकात शाकिब-अल-हसनने बांगलादेशची कमान सांभाळली. या स्पर्धेत शाकिबने फलंदाजीत अतिशय खराब कामगिरी केली, तो फॉर्ममध्ये दिसला नाही. शाकिबच्या खराब कामगिरीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. आता बांगलादेशी अष्टपैलू खेळाडूने स्वतः हा उघड केले की तो डोळ्यांच्या समस्येने ग्रासला असून त्याने या काळात संपूर्ण विश्वचषक खेळला होता. या स्पर्धेत शाकिबची दृष्टी धूसर होती, त्यामुळे त्याला फलंदाजी करण्यात अडचणी येत होत्या.

विश्वचषकादरम्यान शाकिब त्याच्या बालपणीचा गुरू नझमुल आबेदीन यांच्याकडेही गेला होता, जिथे त्याचे दीर्घ फलंदाजीचे सत्र होते. मात्र त्यानंतरही शाकिबला फलंदाजीत विशेष काही करता आले नाही. आता ‘क्रिकबझ’शी बोलताना या अष्टपैलू खेळाडूने सांगितले की, तो संपूर्ण विश्वचषक अंधुक नजरेने खेळला. भारतात झालेल्या स्पर्धेत बांगलादेशला केवळ दोन विजय मिळाले आणि ते गुणतालिकेत आठव्या स्थानावर राहिले. मात्र, त्यानंतरही त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मध्ये स्थान मिळाले.

Saif Ali Khan And Arvind Kejriwal
Saif Ali Khan : “गुजरातच्या तुरुंगात बसलेला गुंड…” सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेत केजरीवालांकडून भाजपा लक्ष्य
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
He should focus on his batting and not hairstyle Adam Gilchrist slams Shubman Gill his failures
Shubman Gill : ‘हेअरस्टाइलवर नव्हे तर फलंदाजीवर लक्ष दे…’, अ‍ॅडम गिलख्रिस्टने ‘या’ भारतीय फलंदाजाला फटकारले
Hrishikesh Shelar
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’फेम अभिनेत्याने प्रियदर्शन जाधव, विशाखा सुभेदार यांच्याबरोबर काम करण्याचा सांगितला अनुभव, म्हणाला…
Jasprit Bumrah : Kapil Dev shoots down 1983 World Cup teammates controversial take on Bumrah's workload
Jasprit Bumrah : ‘बुमराहशी माझी तुलना करू नका…’, वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे वर्कलोड मॅनेजमेंटबाबत मोठं वक्तव्य
Rohit Sharma Practice With Mumbai Ranji Trophy Team at Wankhede Stadium
Rohit Sharma: रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत, हिटमॅनने घेतला मोठा निर्णय; मुंबई संघासह…
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…

हेही वाचा: AUS vs PAK 2nd Test: उस्मान ख्वाजाने आता खेळली नवी चाल, आपल्या मुलींची नावे लिहून उतरला मैदानात; पाहा Video

शाकिबने याबाबत खुलासा करत सांगितले की, “विश्वचषकातील केवळ एक-दोन सामन्यांमध्ये असे नाही, तर संपूर्ण स्पर्धेत डोळ्यांचा त्रास कायम होता.” त्याने पुढे सांगितले की, “मला फलंदाजी करताना चेंडूला सामोरे जाण्यात अडचण येत होती. जेव्हा मी डॉक्टरांकडे गेलो, तेव्हा माझ्या डोळ्याच्या रेटिना किंवा कॉर्नियामध्ये पाणी होते. त्यांनी मला काही औषधे दिली त्यात काही ड्रॉप होते. त्यातील दोन थेंब रोज मी डोळ्यात टाकत होतो. मला सांगितले की, स्वतःचा ताण जर कमी करायचा असेल तर काही दिवस क्रिकेटपासून दूर राहा. माझी फलंदाजी खराब होण्याचे हे कारण आहे की नाही याची मला खात्री नव्हती. माझ्या डोळ्यांचा त्रास जेव्हा अधिक वाढला तेव्हा हे खूप जाणवले. विश्वचषकानंतर जेव्हा मी लंडनमध्ये तपासणी केली तेव्हा फारसा ताण नव्हता आणि मी म्हणालो की सध्या विश्वचषक नाही, त्यामुळे तणाव नाही.”

शाकिब पुढे म्हणाला की, “आता मला थोडे बरे वाटत आहे. विश्वचषकात फलंदाजी करत असताना कधी कधी चेंडू मला लागून दुखापत होईल का? अशी भीती देखील वाटून गेली. मात्र, सहकाऱ्यांनी मला खूप सांभाळून घेतले. मी आगामी काळात संघात पुन्हा उत्तम प्रदर्शन करण्यासाठी उत्सुक आहे.”

हेही वाचा: Usman Khawaja: उस्मान ख्वाजाने बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी आयसीसीवर केला गंभीर आरोप; म्हणाला, “दुटप्पी भूमिका…”

२०२३च्या विश्वचषकात कामगिरी खराब होती, २०१९ मध्ये खळबळ उडाली होती

२०२३च्या एकदिवसीय विश्वचषकात शाकिबने ७ डावात २६.६च्या सरासरीने १८६ धावा केल्या. या काळात त्याने फक्त एक अर्धशतक झळकावले. याशिवाय त्याने गोलंदाजीत ९ विकेट्स घेतल्या. याउलट, शाकिबने २०१९च्या विश्वचषकात अप्रतिम कामगिरी केली, जिथे त्याने ८ डावात फलंदाजी करताना ८६.६च्या सरासरीने ६०६ धावा केल्या आणि गोलंदाजीत ११ विकेट्स घेतल्या.बांगलादेशने ९ सामन्यांत केवळ २ विजय आणि ७ पराभवांसह विश्वचषकातील आपला प्रवास संपवला. संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. विश्वचषकादरम्यानच शाकिबच्या बोटाला दुखापत झाली होती. यानंतर तो न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतूनही बाहेर पडला. तो पुनरागमन कधी करणार, याबाबत त्याने कुठलीही माहिती दिलेली नाही.

Story img Loader