ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पिनर शेन वॉर्नचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजल्यावर शेन वॉर्नने स्वत:ला ‘सेल्फ आयसोलेट’ करून घेतले आहे. शेन वॉर्न सध्या ‘द हंड्रेड’ ची टीम लंडन स्पिरीट चे मुख्य प्रशिक्षक आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त टीम मधील अजून एक जण पॉझिटिव्ह आला आहे.
लंडन स्पिरिट विरूद्ध सदर्न ब्रेव हा सामना लॉर्ड्स येथे होण्याच्या अगोदरच शेन वॉर्न आजारी पडले. आजारी पडल्याने वॉर्नची करोना चाचणी करण्यात आली. चाचणी नंतर शेन वॉर्नला करोना झाल्याचे स्पष्ट झाले. परंतु, अजूनपर्यंत लंडन स्पिरिट संघातील खेळाडू पॉझिटिव्ह आलेले नाहीत. ही एक लंडन स्पिरिट संघासाठी चांगली बाब आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


‘द हंड्रेड’ सुरू झाल्यापासुन शेन वॉर्न आणि ट्रेंड रॉकेट्स संघाचे मुख्य प्रशिक्षक एंडी फ्लावर करोना पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान शेन वॉर्नचा लंडन स्पिरिट संघ आतापर्यंत झालेल्या ३ सामन्यांत २ पराभव आणि १ सामाना अनिर्णित राहिला आहे. यापुढे वॉर्नच्या गैरहजेरीत डेवीड रिप्ले मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडतील.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shane warne corona positive marathi news sports cricket ssh
First published on: 02-08-2021 at 05:26 IST