भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने त्याच्या बरे होण्याबाबत सोशल मीडियावर एक सकारात्मक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये इमारती दिसत आहे आणि तो ताज्या हवे श्वास घेताना दिसत आहे. आपल्या आवडत्या खेळाडूच्या पोस्टवर चाहते खूश दिसत आहेत. भारतीय संघासाठी ही आनंदाची बातमी आहे.

कारण पंत एका भीषण कार अपघातातून मानसिकदृष्ट्या सावरत आहे. मात्र, ऋषभ पंतला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे की नाही याची माहिती मिळालेली नाही. पोस्ट शेअर करताना ऋषभ पंतने लिहिले की, “फक्त बाहेर बसून ताज्या हवेचा श्वास घेतल्याने, तुम्हाला इतके भाग्यवान वाटेल हे कधीच माहीत नव्हते.”

Rishabh Pant said that he feels lucky to have a breath of fresh air
ऋषभ पंत इंस्टाग्राम स्टोरी (फोटो-इंस्टाग्राम)

पंतच्या दुखापतीचा भारतीय संघाला मोठा फटका बसला आहे. तो आगामी बॉर्डर-गावसकर कसोटीत खेळू शकणार नाही. भारताविरुद्धची मालिका आणि वर्षभर क्रिकेट खेळू शकणार नाही. ३० डिसेंबर रोजी, ऋषभ पंत बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळून दिल्लीहून धंदेरा रुरकी येथील घरी कारने परतत होता. क्रिकेटर ऋषभच्या गाडीला नरसनजवळ अपघात झाला. अपघातानंतर कार लोखंडी दुभाजकावर चढून सुमारे २०० मीटर पुढे जाऊन उलटली.

गाडी उलटल्यानंतर काही वेळातच आग लागली. ज्यात पंत थोडक्यात बचावला आणि कसातरी आग लागण्या अगोदर गाडीतून बाहेर पडला. दुखापतीनंतर पंतवर रुरकी येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर काही दिवस डेहराडूनमध्ये उपचार घेतल्यानंतर त्यांच्यावर सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयातही त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

हेही वाचा – WI vs ZIM: गॅरी बॅलेन्सने वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावत रचला इतिहास; ‘ही’ कामगिरी करणारा जगातील दुसराच खेळाडू

गेल्या महिन्यात झालेल्या अपघातानंतर पंतने सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये त्याने शस्त्रक्रियेबाबत महत्त्वाचे अपडेट दिले होते. तसेच वाईट काळात प्रार्थना आणि साथ दिल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले होते.