scorecardresearch

WPL 2023 Final MI vs DC: शिखा-राधाने महिला टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास, शेवटच्या विकेटसाठी केली विक्रमी भागीदारी

WPL 2023 Final MI vs DC Updates: दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ गडी गमावून १३१ धावा केल्या. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सला १३२ धावांचे लक्ष्य दिले.

WPL 2023 Final MI vs DC match Updates
शिखा आणि राधा (फोटो-ट्विटर)

WPL 2023 Final MI vs DC Match Updates: महिला प्रीमियर क्रिकेट लीग २०२३ चा अंतिम सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जात आहे. या विजेतेपदाच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघ मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने २० षटकांत ९ गडी गमावून १३१ धावा केल्या. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सला १३२ धावांचे लक्ष्य दिले आहे. दरम्यान शिखा पांडे आणि राधा यादवने १० व्या विकेटसाठी नाबाद ५२ धावांची खेळी करुन विक्रम रचला आहे.

एकवेळेस असे वाटत होते की, दिल्लीचा संघ १०० धावांचा आकडा पार करु शकणार नाही. पण शिखा पांडे आणि राधा यादवने तुफान अर्धशतकी भागीदारी करत मुंबईला चांगलेच झुंजवले. दोघींनी प्रत्येकी २७-२७ धावा केल्या. या दोघींनी १० व्या विकेटसाठी शेवटच्या २४ चेंडूत नाबाद ५२ धावांची भागीदारी केली. या भागीदारी इतिहास रचत आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. कारण महिला टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत १० व्या विकेटसाठी इतक्या धावांची भागीदारी कधीही झालेली नाही.

७९ धावांत नऊ गडी गमावल्यानंतर शिखा पांडे आणि राधा यादव यांनी अखेरच्या विकेटसाठी २४ चेंडूत नाबाद ५२ धावांची भागीदारी केली. राधाने १२ चेंडूत नाबाद २७ तर शिखाने १७ चेंडूत नाबाद २७ धावा केल्या. राधाने आपल्या खेळीत दोन चौकार आणि दोन षटकार मारले. त्याचवेळी शिखाच्या बॅटमधून तीन चौकार बाहेर पडले. तिने एक षटकारही मारला.

तत्पूर्वी या सामन्यात दिल्लीच्या फलंदाजांनी निराशा केली. कर्णधार मेग लॅनिंग वगळता कोणीही जास्त वेळ क्रीजवर टिकू शकले नाही. लॅनिंगने २९ चेंडूत ३५ धावा केल्या. ती दुर्दैवाने धावबाद झाली. मारिजन कॅपने १८ आणि शफाली वर्माने ११ धावांचे योगदान दिले. मुंबईकडून इस्सी वँग आणि हीली मॅथ्यूजने प्रत्येकी तीन बळी घेतले. अमेलिया केरला दोन बळी मिळाले.

हेही वाचा – World Boxing Championship: निखत झरीन सलग दुसऱ्यांदा ठरली वर्ल्ड चॅम्पियन, भारताला मिळाले तिसरे सुवर्णपदक

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –

दिल्ली कॅपिटल्स महिला संघ: मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिजन कॅप, एलिसे कॅप्सी, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, तान्या भाटिया (यष्टीरक्षक), राधा यादव, शिखा पांडे, मिन्नू मणी

मुंबई इंडियन्स महिला संघ: यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), मेली केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वोंग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतिमनी कलिता, सायका इशाक

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 22:03 IST

संबंधित बातम्या