भारताचा आघाडीचा फलंदाज शिखर धवन सोशल मीडियावर सक्रिय असतो. शिखर धवन कधी व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असतो, तर कधी मजेशीर रिल शेअर करत असतो. आता शिखर धवनने इन्स्टाग्रामवर बाइक चालवतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे. इन्स्टाग्रामवर जवळपास १ लाखाहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे.
गदर चित्रपटातील “मै निकला गड्डी लेके” या गाण्यावर त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत धवन कधी उभा राहून, तर कधी बसून बाइक चालवताना दिसत आहे.
View this post on Instagram
यापूर्वी शिखर धवनच्या बासरी वादनावर पृथ्वी शॉनं गाणं गायलं होतं. हा व्हिडिओ शिखर धवनने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. हा व्हिडिओला काही तासातचं हजारोंच्या संख्येने लाइक्स मिळाले होते. शिखर धवन बासरी वाजवत होता. तर पृथ्वी शॉ ‘ये शाम मस्तानी’ गाणं गात होता.
View this post on Instagram
क्रिकेट जगतात शिखर धवन गब्बर नावाने प्रसिद्ध आहे. शिखर धवन आतापर्यत ३४ कसोटी सामने खेळला आहे. कसोटीत त्याने २,३१५ धावा केल्या आहेत. यात ७ शतक, ५ अर्धशतकांचा समावेळ आहे. तर १४५ एकदिवसीय सामने खेळला आहे. त्यात त्याने ६,१०५ धावा केल्या आहेत. यात १७ शतकं आणि ३३ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर ६७ टी-२० सामने खेळला आहे. टी २० स्पर्धेत त्याने आतापर्यंत एकूण १,७५९ धावा केल्या आहेत. यात ११ अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत शिखर धवन १८४ सामने खेळला आहे. त्यात त्याने ५,५७६ धावा केल्या आहेत. यात २ शतकं आणि ४४ अर्धशतकांचा समावेश आहे.