Shikhar Dhawan Dance on Na Ready Song: भारताचा स्टार फलंदाज शिखर धवन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. धवन सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. तो प्रत्येकवेळी कोणता ना कोणता एक व्हिडिओ शेअर करताना दिसतो. यावेळी शिखर धवन अभिनेता विजयच्या आगामी ‘लिओ’ या चित्रपटातील ‘ना रेडी’ गाण्यावर डान्स करताना दिसला. धवनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दाक्षिणात्य अभिनेता विजयच्या लिया या चित्रपटातील ना रेडी हे गाणे जूनच्या अखेरीस प्रदर्शित झाले आहे. हे गाणे रिलीज होताच प्रचंड हिट झाले. हे गाणे आतापर्यंत करोडो चाहत्यांनी यूट्यूबवर पाहिले आणि ऐकले आहे. सोशल मीडिया यूजर्स गाण्याचे अनेक रील व्हिडीओ बनवत आहेत. आता यावर शिखर धवनने पण रील बनवून शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये धवनचा डान्स पाहण्यासारखा आहे. अभिनेता विजयच्या लिओ या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनागराज यांनी केले आहे.

या व्हिडीओवर या क्रिकेटपटूंनी दिल्या प्रतिक्रिया –

धवनच्या या व्हिडीओवर अनेक क्रिकेटपटूंनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, माजी खेळाडू इरफान पठाण अशा अनेक खेळाडूंचा सहभाग आहे. कार्तिकने लिहिले, ‘छान आहे. चेहऱ्यावरील भाव अधिकच सुंदर.’ याशिवाय युजवेंद्र चहलने लिहिले, ‘शिखी भैया काय बर्थडे गिफ्ट आहे, या गोष्टीवर मोठा चुम्मा.’ त्याचबरोबर इरफान पठाणने हसण्याचे इमोजी कमेंट केली आहेत.

शिखर धवन बराच काळ टीम इंडियातून बाहेर –

शिखर धवन बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. डिसेंबर २०२२ मध्ये त्याने बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय सामन्याद्वारे भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याच वेळी, तो जुलै २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळला होता. विशेष म्हणजे शिखर भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – MS Dhoni: कॉमेडियन योगी बाबूची धोनीने घेतली फिरकी, VIDEO पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

शिखर धवनने आतापर्यंत ३४ कसोटी, १६७ एकदिवसीय आणि ६८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ४०.६१ च्या सरासरीने २३१५ धावा, एकदिवसीय सामन्यात ४४.११ च्या सरासरीने ६७९२ धावा आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २७.९२च्या सरासरीने आणि १२६.३६ च्या स्ट्राईक रेटने १७५९ धावा केल्या आहेत.