पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर भारतातदेखील खूप लोकप्रिय आहे. पाकिस्तानच्या रावळपिंडी शहरातील रहिवासी असलेल्या शोएब अख्तरला त्याच्या गोलंदाजीमुळे ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ असे नाव देण्यात आले. त्याच्या वेगवान गोलंदाजीशिवाय शोएब अख्तर त्याच्या वादामुळे बर्‍याचदा चर्चेत होता. आजकाल अख्तर यूट्यूबवर एक चॅनेल चालवितो, जे भारतातही खूप लोकप्रिय आहे. अशात आता शोएब अख्तरने एक मोठा खुलासा केला आहे.

दरम्यान, ट्रिब्यून एक्सप्रेसने एक अहवाल दावा केला की, अख्तर सांगितले त्याला बॉलिवूडचे दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या ‘गँगस्टर’ (२००५) चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळाली होती. मीडिया अहवालात असा दावा केला गेला आहे की गँगस्टरमध्ये त्याला मुख्य भूमिका करण्याची ऑफर देण्यात आली होती. गेल्या वर्षी अख्तरने त्याच्या जीवनावर बायोपिक बनवला जाणार असल्याचे सांगितले होते.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने ट्विटद्वारे आपल्या चाहत्यांना त्याचा ड्रीम प्रोजेक्ट अयशस्वी झाल्याची माहिती दिली होती. अख्तरने खुलासा केला होता की “रावळपिंडी एक्स्प्रेस” नावाचा बायोपिक त्याच्या जीवनावर बनवला जात होता. परंतु त्याने यामध्ये सामील टीमशी असलेले संबंध तोडले. या प्रकल्पातून माघार का घेत आहे, यामागचे कारणही त्यानी सांगितले होते. त्याने निर्मात्यांना धमकीही दिली होती.

पाकिस्तानचा अनुभवी गोलंदाज शोएब अख्तर रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखला जात असे. तो त्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट आणि प्राणघातक वेगवान गोलंदाजांपैकी एक होता. आपल्या संपूर्ण क्रिकेट कारकीर्दीत अख्तरने अनेक गेम चेजिंग प्रदर्शन केले. परंतु त्याच्या काही अत्यंत अविश्वसनीय गोलंदाजीचे कारनामे भारताविरुद्ध पाहिला मिळाले.

हेही वाचा – Glenn Maxwell Injured: ग्लेन मॅक्सवेलला पुन्हा दुखापत; आरसीबीच्या वाढल्या अडचणी, पाहा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शोएब अख्तरची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द –

२०११ मध्ये शोएब अख्तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. त्याने आपल्या कारकीर्दीत ४६ कसोटी, १६३ एकदिवसीय आणि १५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यात त्याने १७८ विकेट्स, एकदिवसीय सामन्यात २४७ आणि टी-२० मध्ये १९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने ४५० हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.