Shoaib Akhtar on Shaheen Shah Afridi: टी-20 विश्वचषक २०२२ च्या स्पर्धेत पाकिस्तानला इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदीला अंतिम सामन्यात दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला गोलंदाजी करता आली नाही. मात्र, आफ्रिदीने मैदान सोडलायला नको होते, असे शोएब अख्तर म्हणाला. शाहीनच्या जागी तो असता तर तो पाकिस्तानसाठी मेला असता, पण उरलेली २ षटके टाकली असती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शोएब अख्तरने अप्रत्यक्षपणे शाहीन आफ्रिदीवर निशाणा साधला आहे. शोएब अख्तरने एका पाकिस्तानी टीव्ही कार्यक्रमात सांगितले की, “शाहीन आफ्रिदीला टी-२० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा सुपरस्टार बनण्याची संधी होती, जी त्याने गमावली. शाहीनच्या जागी तो असता, तर त्याने गुडघे टेकले नसते. गुडघ्यावर नंतर उपचार करता आले असते, परंतु तो क्षण परत येणार नाही.”

शोएब अख्तर पुढे म्हणाला, “जर मी शाहीन आफ्रिदी असतो, तर मी पाकिस्तानसाठी टी-२० वर्ल्ड कप फायनलमध्ये माझ्या गुडघ्यात इंजेक्शन घेतले असते. मी पेनकिलर घेतले असते आणि ती दोन षटके टाकली असती, मी खाली पडलो असतो, पुन्हा उठलो असतो, पुन्हा पडलो असते, पुन्हा उठलो असतो…, पण तरीही मी गोलंदाजी केली असती.”

शोएब म्हणाला, “जर मी त्याच्या (शाहिद आफ्रिदी) जागी असतो, तर ती १२ मिनिटे, ते १२ चेंडू, त्या १२ चेंडूने मला जगातील सर्वात मोठा सेलिब्रिटी बनवले असते, पाकिस्तानचा मी राष्ट्रीय हिरो बनलो असतो. मी एक चेंडू टाकला असता, पुन्हा पडलो असतो आणि गुडघा फुटला असा. मला वेदना झाल्या असत्या, माझ्या तोंडातून रक्त येत आले असते. मी पुन्हा उभा राहिलो असतो, मग त्या गुडघ्याला इंजेक्शन घेतली असती. गुडघा सुन्न झालेल्या गुडघ्याने परत आलो असतो, पुन्हा पडलो असतो… पुन्हा उठलो असतो.”

हेही वाचा – INDW vs IREW: ‘करो या मरो’च्या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

शोएब अख्तरने आपले बोलणे चालू ठेवत म्हटले, लोक म्हणतील की तुमचा अंत होईल. गुडघा मोडेल. मरणार नाही मी म्हणेन की अशा वेळी मरण पत्करलेले बरे, पण विश्वचषक हातून जाऊ नये. अख्तर पुढे म्हणाला, हा तो क्षण होता जेव्हा तुम्ही सुपरस्टार होऊ शकला असता. मी जर तो (आफ्रिदी) असतो तर मी पाकिस्तानसाठी मेलो असतो.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shoaib akhtar statement if it was me i would have died for pakistan and become a national hero vbm
First published on: 20-02-2023 at 21:46 IST