Shoaib Malik and Wasim Akram says Afghanistan Played Better Cricket Than Pakistan: अफगाणिस्तान संघाने या विश्वचषक स्पर्धेतील आपली मोहीम संपवली असून उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्याचवेळी, हे अशक्य असले तरी, पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्याच्या काही संधी आहेत. दरम्यान, पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी या स्पर्धेतील आपल्या संघाच्या कामगिरीची तुलना करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या संघाच्या कामगिरीबद्दल दोन माजी कर्णधार म्हणाले की, जर आपण फक्त विश्वचषकाबद्दल बोललो तर यावेळी अफगाणिस्तानचा संघ पाकिस्तानपेक्षा खूपच चांगला खेळला आहे.

हे मत माजी दिग्गज कर्णधार वसीम अक्रम आणि शोएब मलिक यांचे आहे. हे दोन माजी कर्णधार आजकाल पाकिस्तानमधील क्रिकेट विश्वचषकाचे प्रसारण करणाऱ्या चॅनल ए स्पोर्ट्सवर विश्वचषक सामन्यांपूर्वी आणि नंतर संघांच्या कामगिरीवर चर्चा करतात. शनिवारी होणार्‍या पाकिस्तानच्या शेवटच्या साखळी सामन्यापूर्वी त्यांनी सांगितले की, या स्पर्धेत त्यांच्या संघाची कामगिरी अपेक्षेपेक्षा वाईट होती आणि अफगाणिस्तान संघ त्यांच्यापेक्षा चांगला खेळला, ज्याची फार कमी लोकांना अपेक्षा होती.

कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा माजी फलंदाज आणि माजी कर्णधार शोएब मलिक म्हणाला, ‘माझ्या मते अफगाणिस्तानने आमच्यापेक्षा चांगले क्रिकेट खेळले आहे. जर आपण फक्त विश्वचषकाबद्दल बोलत असाल, तर होय अफगाणिस्तानने आपल्यापेक्षा चांगले क्रिकेट खेळले आहे.’

हेही वाचा – AUS vs BAN: बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला दिले लक्ष्य ३०७ धावांचे, तौहीदने केली शानदार ७४ धावांची खेळी

माजी दिग्गज कर्णधार आणि महान वेगवान गोलंदाज वसीम अक्रमनेही मलिकच्या विधानाचे समर्थन केले आहे. पाकिस्तान संघाच्या या कामगिरीचे एक कारण थकवा हे असू शकते, असे ते म्हणाले. भारताकडून पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेकडूनही पराभव झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वसीम अक्रम म्हणाला, ‘अफगाण खेळाडू मजबूत दिसत होते. सतत क्रिकेट खेळणाऱ्या आमच्या खेळाडूंमध्ये कदाचित थकवा दिसत होता. अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंनी पाकिस्तानपेक्षा सरस कामगिरी केली आहे, यात काही शंका नाही. मात्र, आज जर पाकिस्तानने चमत्कार घडवला, तर तो न्यूझीलंडला उपांत्य फेरीतून बाहेर करून आपले स्थान निश्चित करू शकतो.’