पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज शोएब मलिक सध्या सानिया मिर्झासोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो आणि सानिया वेगळे होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, आता शोएबचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो लाइव्ह टीव्हीवरच रडताना दिसत आहे.

हा व्हिडिओ पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० विश्वचषक २०२२ च्या अंतिम सामन्याच्या एक दिवस आधीचा आहे. ज्यामध्ये वकार युनूस, वसीम अक्रम, मिसबाह-उल-हक आणि शोएब मलिक एका पाकिस्तानी चॅनलवर पॅनेल चर्चेत उपस्थित होते. त्यावेळी अँकर शोएब मलिकला २००७ च्या टी-२० विश्वचषकाच्या फायनलमधील पराभव आणि २००९ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता, मात्र या प्रश्नाचे उत्तर देताना शोएब भावूक झाला आणि रडला.

या व्हायरल व्हिडीओमध्ये अँकर शोएबला विचारतो की, आधी मी तुला २००७ च्या फायनलमधील पराभव आणि नंतर २००९ मधील विजयाबद्दल विचारतो. या प्रश्नावर मलिक म्हणतो, ‘मिस्बाह भाईने जिथून काम संपवले तिथून मी युनूस भाईबद्दल नक्कीच बोलेन. त्याने माझ्यासोबत अगदी असेच केले, जेव्हा आम्ही २००९ मध्ये फायनल जिंकलो. तेव्हा त्याने मला बोलवले आणि ट्रॉफी पकड असे सांगितले. ते अगदी खास होते.’

हे सांगितल्यानंतर शोएब खूप भावूक झाला आणि लाइव्ह टीव्हीवरच रडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून चाहते हा व्हिडिओ खूप शेअर करत आहेत. त्याचवेळी शोएब मलिकच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे झाले, तर सध्या काहीही बरोबर होताना दिसत नाही. सानिया मिर्झासह त्याच्या घटस्फोटाच्या बातमीने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे, परंतु अद्याप या प्रकरणावर दोघांकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

हेही वाचा – T20 World Cup Final : भारत फायनलमध्ये नसला तरी इंग्लंड-पाकिस्तान मॅचनंतर ‘या’ भारतीयाचा आवाज दुमदूमणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामन्याबद्धल बोलायचे, तर टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम शर्यतीतून भारत आधीच बाहेर पडला आहे. टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध १० विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. आता अंतिम फेरीत आज दुपारी १:३० वाजता इंग्लंडचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे.